भूम (प्रतिनिधी)- शंकरराव पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व तहसील कार्यालय भूम यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 25 रोजी 14 वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. 

या कार्यक्रमाला तहसीलदार सचिन खाडे, नायब तहसीलदार प्रविण जाधव, संजय स्वामी, संस्था सहसचिव तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष शिंदे, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. चंदनशिव, उपप्राचार्य डॉ. डी.व्ही. शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. नंतर राष्ट्रीय मतदान जागृती विषयी शपथ घेण्यात आली. मतदान जनजागृती व नोंदणी याविषयी ज्याने चांगले काम केले त्यांना तहसील विभागाकडून पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या स्वयंसेवकांना व राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रांगोळी, निबंध, स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्यातील विजेत्याना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी तहसीलदार सचिन खाडे यांनी मतदार दिनानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी तहसील विभागातील सदस्य, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बी.के. जगताप तर आभार प्रा.नंदू जगदाळे यांनी केले.


 
Top