भूम (प्रतिनिधी)-येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या परवडणारी कांदा चाळ शेतकऱ्यांसाठी ठरते वरदान या विज्ञान प्रयोगाची तालुक्यातून जिल्हास्तरावर प्राथमिक गटामधून निवड झालेली होती ही कांदा चाळ विकास आर्यन जाधव व ज्ञानेश्वर अण्णा पाटोळे या विद्यार्थ्यांनी तयार केली होती. यासाठी प्रशालेतील विज्ञान शिक्षक दत्तात्रय गुंजाळ व उत्तरेश्वर पायघन यांनी मार्गदर्शन केले होते. दिनांक 23 व 24 जानेवारी 2024 या कालावधीत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन ज्ञान प्रबोधिनी विद्यालय हरळी तालुका लोहारा जिल्हा धाराशिव या ठिकाणी संपन्न झाले. या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटामधून वरील प्रयोगाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे
या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक तात्या कांबळे यांनी व सर्व शिक्षकांनी सदरील विद्यार्थ्यांचा शाल बुके व पुस्तक भेट देऊन सत्कार केला. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचे पालक विकास सुखदेव जाधव, अण्णा अधिकराव पाटोळे हे आवर्जून उपस्थित होते. या विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यातून प्राथमिक गटातून 24 व माध्यमिक गटातून 24 प्रयोग सादर करण्यात आलेले होते. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापूराव अवताडे व उपाध्यक्ष ॲड. विठ्ठल खवले यांनी अभिनंदन केले. या यशाचे कौतुक होत आहे