परंडा (प्रतिनिधी) - सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेल्या सुफी संत हजरत ख्वॉजा बद्रोद्दीन चिश्ती शहीद रहेमतुल्लाह यांचा 704 वा उरुस शनिवारी दि.20 रोजी साजरा करण्यात आला. उर्स निमित्त येथिल तहसिल कार्यालयातून मोठ्या उत्साहात संदल मिरवणुक काढण्यात आली.ऊर्स यात्रेला महाराष्ट्राच्या विविध भागातून हजारो भावीक शहरात दाखल झाले होते. “हजरत ख्वॉजा बद्रोद्दीन की दो चारो दीन” च्या उद्घोषणाने अख्खे परंडा शहर दुमदुमून निघाले.

उरूस संदल मिरवणुकीची सुरुवात येथिल तहसील कार्यालयातून करण्यात आली. फोतेहखानी कार्यक्रम पार पडल्यानंतर मानाची चादर तहसीलदार घनश्याम अडसूळ यांच्या डोक्यावर देण्यात आली. अडसूळ यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, नगराध्यक्ष जाकीर सौदागर, ॲड नुरूद्दीन चौधरी यांच्यासह अन्य भाविकांच्या डोक्यावरील फुलांच्या चादरी मानाच्या घोडयावर चढवण्यात आल्या. यावेळी डॉ प्रतापसिंह पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, उबाठा गट शिवसेना जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, राष्ट्रवादीचे नवनाथ जगताप, शिध्देश्वर पाटील, बाळासाहेब हाडोग्रीकर, उद्योजक काका साळुंके, पोलीस निरिक्षक विनोद इज्जपवार, सपोनि कविता मुसळे, डॉ जुहूर सय्यद, उद्योजक भैरवनाथ शिंदे, माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल, रिपाईचे प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे, राहुल बनसोडे, नगरसेवक सुबोधसिंह ठाकुर, बाजार समिती सभापती राजकुमार जैन, नानासाहेब पवार, संजय पुजारी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ॲड संदीप पाटील, माजी नगराध्यक्ष रमेशसिंह परदेशी, डॉ अबरार पठाण, शब्बीरखाँ पठाण, ईस्माइल कुरेशी, माजी नगरसेवक सर्फराज कुरेशी, रत्नकांत शिंदे, मैनुद्दीन तुटके, मतीन जिनेरी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष श्रीहरी नाईकवडे, सुभाष शिंदे, मसरत काजी, नसीर शहाबर्फीवाले, वाजिद दखनी, संचालक हरिचंद्र मिस्कीन, उद्योजक राजाभाऊ शेळके, जावेद पठाण, ॲड जहीर चौधरी, दिपक थोरबोले, नदीम मुजावर, हाजी नय्युम मुजावर, नवाबोद्दीन मुजावर, समीर पठाण, गणेश राशनकर, मुकुल देशमुख, आदी उपस्थित होते. तहसील कार्यालयात उरूस कमेटीच्या वतीने करण्यात आला. मान्यवरांच्या सत्कारानतंर संदल मिरवणुकीला ढोल ताश्याच्या गजरात तहसिल कार्यालयातून सुरुवात झाली. दरम्यान संदल मिरवणुक शिवाजी चौक मार्गे टिपु सुलतान चौक, मंडईपेठ, जुनी आडतलाईन, महात्मा फुले चौक, कुराड गल्ली, कुरेशी गल्ली मार्गे मिरवणूक सुफी संत हजरत ख्वॉजा बद्रोद्दीन चिश्ती शहीद रहेमतुल्लाह यांच्या दर्गाह येथे पोहचली. त्या ठिकाणी मानाच्या घोडयाने दर्गाहच्या पायऱ्या क्षणात पार करून हजरत खाँजा बद्रोदीन यांच्या समाधीसमोर उभे राहून सलामी दिली. या वेळी दुतर्फा उभा राहिलेल्या भाविकांनी हजरत ख्वॉजा बद्रोद्दीन की दो चारो दिन च्या उदघोष केला.


 
Top