धाराशिव (प्रतिनिधी)-गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या वतीने अत्यंत आकर्षक असे राम मंदिराची प्रतिकृती व रामाची प्रतिकृती तयार करून एक आगळ वेगळं राममय प्राणप्रतिष्ठा देखावा तयार करण्यात आला आहे. प्रसन्नतेच्या व आनंदी वातावरणामध्ये गेली चार दिवसापासून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी करण्यात येत आहे. अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठासह सारखेच गल्लीमध्ये सर्व तरुण मुली व मुलांनी अत्यंत उत्साहाने व जोशपूर्ण कार्य चालू आहे. मानाचा गणपती व धाराशिवचा महाराज या मंदिराची स्वच्छता, रांगोळी व दिपोत्सव यानिमित्ताने साजरा केला जाणार आहे. श्री रामाच्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या या सोहळ्याच्या निमित्ताने अत्यंत उत्साहाने प्रतिष्ठा उत्सव साजरा करण्यात येत आहे. दि 22 तारखेला होत असलेल्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळात दुपारी पूजा विधि, आरती अत्यंत विधीपूर्वक केली जाणार आहे.  सायंकाळी सात वाजता दीपोत्सव, पूजाविधि करून प्रसाद वाटप रात्री दहा वाजेपर्यंत केला जाणार  आहे. सर्व भक्तांनी व भाविकांनी या पूजा विधी व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा.  मंडळाचे पदाधिकारी यांनी आवाहन केले आहे.


 
Top