धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे (दि.20) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांच्या निवडी व धाराशिव शहर तसेचअंबेहोळ मधील युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश झाला.
त्याच बरोबर पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रशांत नवगिरे, तालुका उपाध्यक्षपदी बाळासाहेब मुकुंद खांडेकर, तालुका सचिव पदी प्रशांत शिंदे, तालुका संघटक पदी कलीम शेख, धाराशिव शहर उपाध्यक्षपदी मुजावर अल्ताफ छोटू शेख, धाराशिव अल्पसंख्यांक शहर उपाध्यक्षपदी बिलाल चाऊस असलम यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार, जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या हस्ते तसेच प्रदेश सचिव गोकुळ तात्या शिंदे, तालुकाध्यक्ष प्रशांत फंड आणि शहराध्यक्ष सचिन तावडे, अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस खलील पठाण अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद खान पठाण यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्ती करण्यात आली.
धाराशिव उस्मानाबाद शहरातील बिलाल चाऊस व अल्ताफ मुजावर यांच्या पुढाकाराने फैसल शेख, इफ्तेखार शेख, अफान पठाण, यश गोरे, मुशरफ पठाण, सोहेल शेख, मुजू मोमीन,कैफ चाऊस, सुनील चाऊस ऐतमास पठाण, भाईजान पठाण, हर्षद पठाण,अरबाज पठाण तसेच आंबेहळ येथील कलीम शेख यांच्या पुढाकाराने मंजूर रसूल सय्यद,शेख दादाभाई सय्यद, लाला शेख, कलीम शेख,पठाण शेख, संजय चौधरी, अलीम शेख,साहिल शेख,सोहेल पठाण, डोंगरे अविनाश शेख लतीफ, पापामिया शेख,माणिक गायकवाड, सिद्धेश्वर डिसले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला.
यावेळी महिला जिल्हा कार्याध्यक्ष अप्सरा पठाण, तुळजापूर तालुका कार्याध्यक्ष संदीप भैया गंगणे,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप,माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर,विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने,सामाजिक न्याय विभाग प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ जानराव,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अरफात काझी,अल्पसंख्यांक शहर कार्याध्यक्ष समीर खतीब, प्रशांत नवगिरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.