धाराशिव (प्रतिनिधी) - संपूर्ण देशामध्ये मतदान घेण्यात येत आहे. या मशीनद्वारे घेण्यात येणाऱ्या मतदानावर मोठ्या प्रमाणात संशय निर्माण झाला असल्यामुळे ती प्रक्रिया बंद करण्यात यावी. तसेच ईव्हीएम हटाओ, देश बचाओ या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश शेतकरी शेतमजूर संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.24 जानेवारी रोजी आंदोलन करण्यात आले.

भारतीय संविधानामध्ये ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेण्याबाबत कुठेही उल्लेख नाही. ज्या जपान देशाने ही मशीन निर्माण केली आहे. तिथे व इतर देश जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिका ब्रिटन या प्रगत देशामध्ये देखील बायलेट पेपरवर मतदान घेतले जाते. तर नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीनवर फार मोठा संशय निर्माण झाला आहे. नवी दिल्लीतील जंतरमंतर रोडवर सॉफ्टवेअर इंजिनियरांनी ईव्हीएम मशीनवर मतदान कसे बदलले जाते. त्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. ईव्हीएम मशीन संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले असून मतदानाची हेराफेरी होऊ शकते याचे मूर्तीमंत उदाहरण देत असताना वाहनांवरती बसवलेल्या चीपमुळे मुंबईच्या किंवा इतर टोलनाक्यावर वाहन गेले असता टोलचे पैसे तात्काळ त्याच्या बँक खात्यातून वजा होतात. उदाहरणार्थ ऑनलाईन पेमेंट करता येते, पाठवता येते या सर्व बाबींचा विचार करता  ईव्हीएम मशीनमध्ये नोंदविलेल्या मतांची हेराफेरी करता येऊ शकते. तसेच एखाद्या वाहनामध्ये चीप बसवली असेल व ते वाहन चोरीला गेले तर ते कोठे आहे ? हे दर्शवून त्या वाहनापर्यंत पोहोचता येते. या सर्व बाबींचा विचार करून ईएमवर मशीनवर मतदान घेण्याऐवजी ते बायलेट पेपरवरती मतदान घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष प्रा मारुती कारकर, बीआरटीएसचे जिल्हा समन्वयक ॲड. विश्वजीत शिंदे, संजय वाघ, दत्ता शांतिनाथ कासार, शहाजी अब्दुल कोतवाल, अर्जुन करंजकर आदींसह इतर सहभागी झाले होते.


 
Top