धाराशिव (प्रतिनिधी)-दिलेल्या स्क्रिप्टन एकाच राजकीय वस्रहरण अगोदर झालय आता तुमच होईल. अशी बेताल विधान करण्याअगोदर विचार करावा जर तुम्हाला याचे पुरावे दिले तर तुम्ही राणा पाटील यांना राजकीय सन्यास घ्यायला भाग पाडणार का? असा सवाल शिवसेना तालुकाप्रमुख सतिष सोमानी यांनी भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांना केला आहे. ठाकरे सरकारने पन्नास टक्के हिस्सा देण्यासाठी प्रक्रीया सुरु केली होती. त्याचे पुरावे देखील सादर करुच. पण ज्यांनी तुमची स्कॅन सही वापरुन जी स्क्रिप्ट सादर केली. त्या राणा पाटलामुळे तुमच्यावर अत्यंत अल्प काळात नामुष्कीची वेळ येईल. त्यावेळी तुम्ही राणा पाटलांना अगोदर विचारुन घ्या की, पुरावे सादर केले तर ते राजकीय सन्यास घेतील का? तसेच यापूर्वी धाराशिव शिवसेनेचा तालुका प्रमुख पदाधिकारी संघटन कार्यशाळा समर्थ मंगल कार्यलयात घेतला होता आणि तो तुम्हला एका बंद बोलीत दिसला त्यापूर्वी आपण स्वतःला महाबलाढ्य समजणाऱ्या 14 पक्षांनी मिळून देखील एका कार्यालयतच जिल्हा मेळावा घेतलेला होता त्या तुलनेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची संघटन कार्यशाळा कितीतरी पटीने मोठी होती परंतु आपल्या अंधभक्ती नजरेला तो एका खोलीत दिसला असा सवाल सोमानी यांनी चालुक्य यांना केला आहे. राणा पाटलांना थेट मुद्दयावर बोलणं कधीच शक्य नाही, विषय भुसंपादन प्रक्रीयेचा आहे. त्यात वाटाघाटीने भुसंपादन ठरले असताना सक्तीच का केल? शेतकऱ्यांच्या डोक्यात झोपीत दगड घालुन तुम्ही त्यांच्याही जमीनीवर डोळा ठेवताय यावर उत्तर द्या असेही अवाहन सोमानी यांनी केला आहे.


 
Top