धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी  तसेच भटक्या व विमुक्त समाजातील व्यक्तींसाठी उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी या दोन संदर्भात सत्कारासाठी निवड करण्यात आली. सत्काराचा कार्यक्रम 24 जानेवारी 2024 रोजी मुंबई येथे पार पडला. श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी,  महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांचे हस्ते डॉ.सचिन ओम्बासे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचा प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला आहे.  

श्री शिरिष यादव यांची उत्कृष्ठ उप जिल्हा निवडणूक अधिकारी पुरस्कार 2024  साठी निवड करण्यात आली. तसेच उत्कृष्ठ मतदार नोंदणी अधिकारी  पुरस्कार 2024  साठी संजय पाटील, मतदार नोंदणी अधिकारी 242- धाराशिव विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी कळंब व भटक्या व  विमुक्त समाजातील व्यक्तींसाठी उत्कृष्ठ कामगिरी करणारी संस्था म्हणून मारुती बनसोडे, परिवर्तन सामाजिक संस्था,नळदूर्ग ता.तुळजापूर जि. धाराशिव यांचा  मुख्य निवडणूक अधिकारी,  महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांचे हस्ते गौरव करण्यात आला. 


 
Top