धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार व महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 च्या अधिनियमानुसार जिल्हयातील सर्व कार्यालयात मराठीचा वापर करण्यान व्यावा, यासाठी व त्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या वतीने जिल्हा मराठी भाषा समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.
या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे हे असून जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, शिक्षणाधिकारी श्रीमती सुधा साळुंके व न.प.च्या मुख्याधिकारी श्रीमती वसुधा फड हे त्या समीतीचे सदस्य आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर हे सदस्य सचिव असून राजेंद्र अत्रे हे अशासकीय सदस्य आहेत. याशिवाय साहित्य क्षेत्रातून भैखनाथ कानडे, ग्रंथालय क्षेत्रातून कुषाल सोनटक्के व शिक्षण क्षेत्रातून समाधान शिकेतोड यांची अशासकीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.