भूम (प्रतिनिधी)-प्रत्येक गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि तरुणात देश प्रेमाचे विचार रुजवण्यासाठी आपले सर्व आयुष्य वेचणारे थोर व्यक्तिमत्त्व संभाजी भिडे यांच्या चळवळीत सक्रिय असणारे 11 युवक शातिराज बोराडे यांच्या नेतृत्वाखाली श्री दुर्ग  प्रतापगडाकडे मार्गस्थ झाले आहे. 

थोर व्यक्तिमत्व असलेले संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी जे गड किल्ले आहेत त्याचे काही प्रमाणात भौतिक संवर्धन होत नाही अशा गड किल्ल्याचा इतिहास,  त्यातील विचार व शौर्याची माहिती नवतरुणाला माहीत असणे आवश्यक आहे . गडकिल्ल्यांचा संवर्धन होणे आवश्यक आहे .  इतिहास त्याची लढाई माहित असणं गरजेचं आहे . याच सदहेतूने संभाजी भिडे यांच्या चळवळीत भूम येथील श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान भूमचे युवा नेतृत्व शांतीराज बोराडे यांच्या पुढाकाराने व नेतृत्वाने गेल्या पाच वर्षापासून गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी जात आहेत.

यावर्षी देखील मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 10 वाजता शांतिराज बोराडे यांच्या नेतृत्वात सिद्धार्थ जाधव, अविष्कार जवाहीर  गणेश हाडे, संकेत सुकाळे, अतुल तिकटे, अक्षय साबळे, विशाल साबळे, ओम साबळे, जय साबळे,  अभिषेक साबळे, धारातीर्थ गडकोट मोहिमेतून श्री दुर्ग रायरेश्वर ते दुर्ग श्री प्रतापगडाकडे श्रीक्षेत्र महाबळेश्वर मार्गे 950 किलोमीटरचा प्रवास करत मार्गस्थ झाले आहेत. यात 150 किलोमीटर अंतर जंगलातून मार्गस्थ होणार आहे . यामुळे या मोहिमेला विशेष महत्त्व आले आहे. 

दुर्गा श्री रायरेश्वर ते प्रतापगडाकडे मार्गस्थ होताना भारतीय जनता पार्टीचे भूम शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, तालुका प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, अ जा ज तालुका अध्यक्ष प्रदीप साठे राजाभाऊ धर्माधिकारी आदीची उपस्थिती होती. या युवकांनी मार्गस्थ होताना देशासाठी जगायचं रं, शिवबान सांगावा धाडलाय र, वेळ पडली तर मरायचं रं, धर्मासाठी झुंजायचं रं, देशासाठी जगायचं रं, याबरोबरच मर्दाची तुटली बघा रे ढाल, रक्ताने शरीर झालं लाल, हाताला गुंडाळीतो शाल, झेलीतो वारंवार बघा तलवार नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.


 
Top