धाराशिव (प्रतिनिधी)- देशातील संविधान व लोकशाही संपविण्यासाठी केंद्रातील एनडीए सरकार वाटचाल करीत आहे. केंद्र सरकारची धोरणे एकूणच शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, युवक, बेरोजगार, महिला, दलित, इतर मागासवर्गीय समाज, अल्पसंख्यांक समाजघटक या सर्व बहुजनांच्या विरोधात आहे. अत्याचार, बलात्कार, धार्मिक उन्माद आणि फसवा जातीधर्मांध राष्ट्रवाद या सर्व गोष्टींना हेतूपुरस्कार खतपाणी घातले जात आहे. त्यामुळे संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी समाजवादी पार्टीच्यावतीने महाराष्ट्रात विभागीय मिळावे घेण्ाार येणार असल्याची माहिती समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते अँड. रेवण भोसले यांनी दिली.

देशाचे संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी समाजवादी पार्टीच्या वतीने दिनांक 13 जानेवारी रोजी मुंबईत विभागीय मेळावा बांद्रा येथील रंगशारदा येथे समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय महासचिव शिवपाल सिंग यादव यांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे. 20 जानेवारी रोजी नागपूर येथे विदर्भ विभागीय मेळावा, संभाजीनगर येथे 21 जानेवारी रोजी मराठवाडा विभागीय मेळावा, नासिक येथे 27 जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्र मेळावा ,पुणे येथे 28 जानेवारी रोजी पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळावा आयोजित केला असल्याची माहिती समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते अँड. रेवण भोसले यांनी दिली आहे.


 
Top