तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या पौष महिन्यातील शांकंभरी नवराञोत्सवा पुर्वीच्या मंचकी निद्रेस गुरुवार दि. 11 जानेवारी राञी पासुन आरंभ झाला.
श्रीतुळजाभवानी मातेच्या शांकभरी नवराञ उत्सव पुर्वीचा मंचकीनिद्रा तयारीस गुरुवार सकाळी दहा वाजण्यास प्रारंभ झाला. प्रथमता सुवासनीनी, आराधीनी ऐकमेकींना हळदीकुंकु लावुन प्रथमता देवीजींचा गादीचा कापुस वेचणे पिंजण्यास आरंभ केला. यावेळी आराधी मंडळी आराधी गीत गायले. नंतर हा कापुस मुस्लीम धर्मिय पिंजारी कुंटुबांनी पिंजुन दिल्यानंतर निकते कुंटुंबियांनी तो नवीन कपड्याने तयार केलेल्या तीन गाद्यांमध्ये भरला.
देविजींचे शेजघर पलंगे कुंटुंबियांनी स्वच्छ धुवुन स्वच्छ केल्यानंतर चांदीचा पलंगावर प्रथमता नवार बांधण्यात आल्या. त्यावर तीन गाद्या व लोड ठेवण्यात आल्यानंतर पलंग पोस टाकुन बाजुला मखमली पडदे लावण्यात आले. पाच वाजता देविजीचे शेजघर पलंगे कुंटुंबियांनी तयार केले.
असा होता विधी !
गुरुवार दि. 11 जानेवारी सांयकाळी 5.30 वा घाट झाल्यानंतर पवेकर यांनी पुजेची हाक मारली नंतर पुजारी श्री देविजींजवळ आला व निर्माल्य विसर्जन करण्यात आले. नंतर भाविकांचे दहीदुध पंचामृत अभिषेक देविजीस करण्यात आल्यानंतर शुध्दस्नान घालण्यात आले. नंतर मेन काढणे विधी झालानंतर आरत्या व नगा-यास हाक मारणे नंतर धार्मिक विधी होवुन नंतर देविजींना भाविकांचे दही दुध पंचामृत अभिषेक करण्यात आले. देविजींची मुळमुर्ती स्वच्छ करण्यात आली. नंतर वाघे कुंटुंबियांनी दिलेली हळद (भंडारा) देविजींना लावण्यात येवुन नंतर देविजींची मुळमुख्य मुर्ती शेजघरात आणुन चांदीचा पलंगावर निद्रस्त करण्यात आली. धुपारती करण्यात आली. नंतर प्रक्षाळपुजा होवुन देविजींचा शांकंभरी नवराञउत्सव पुर्वीचा मंचकीनिद्रेस आरंभ झाला. यावेळी देविजींचे मंहत, भोपे, पुजारी, सेवेकरी, मंदिर विश्वस्त, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थितीत होते.