तुळजापूर (प्रतिनिधी)-प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या आयोध्या येथून आलेल्या आभिमंत्रित अक्षता कलशाची मंगळवार (दि.9) रोजी तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली,यावेळी श्री प्रभू रामचंद्रांच्या जयघोषाने सावरगाव नगरी दुमदुमली होती.
अयोध्या येथे (दि.22) जानेवारी रोजी प्रभू श्रीराम जन्मभूमी आयोध्या येथे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्या निमित्ताने भारतातील कानाकोपऱ्यात अभिमंत्रित मंगलअक्षता पोहोचण्यात येत आहेत. मंगळवारी सावरगावात अक्षता पोहोच झाल्यानंतर अक्षताकलशासह प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली. सायंकाळी 5:30वाजता हनुमान मंदिरातून या शोभायात्रेस प्रारंभ झाला. शोभा यात्रेसाठी श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आकर्षक रथ, डॉल्बी, फटाक्यांच्या आतषबाजीचे नियोजन करण्यात आले होते. दरम्यान उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील रामभक्त टाळकरी मंडळाचे टाळवाद्य साऱ्यांचे लक्ष वेधत होते. तर गावातील महिलांनी दारोदारी सडा -रांगोळी करून प्रभुरामांच्या प्रतिमेचे मनोभावे पूजन करत दर्शन घेतले. भव्य शोभायात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी हभप सचिन जोशी, हभप एकनाथ हुरडे, हभप आबा लिंगफोडे, हनुमंत गाभणे, बालाजी शिंदे, जग्गनाथ काडगावकर, बाळासाहेब शिंदें, काशिनाथ राऊत, नेताजी कदम, ओंकार काडगावकर, अनिल माळी, रमेश काडगावकर, गुरुनाथ लिंगफोडे, राजेंद्र तोडकरी, प्रा.कानिफनाथ माळी, राहुल अक्कलकोटे, दादासाहेब काडगावकर, सुधाकर तानवडे, मुकुंद कुलकर्णी यांच्यासह श्रीराम प्रतिष्ठान आणि सकल हिंदू-धर्म बांधवांनी परिश्रम घेतले.