तुळजापुर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातून हजारो मराठा बांधव मुंबईला जाणार तुळजापूर तालुक्यातील हजारो मराठा बांधव मुंबईला जाणार आहेत. सकल मराठा समाजाच्या वतीने तुळजापूर येथे शनिवारी (दि. 13) झालेल्या बैठकीत या संदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यात आला.

मराठा आरक्षण व मुंबई दौऱ्याच्या अनुषंगाने सकल मराठा समाजाच्या वतीने तुळजापूर येथे शनिवारी सायंकाळी बैठक घेण्यात आली. यावेळी मुंबईला मराठा समाज बांधवाची नोंदणी व तयारी या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच मुंबई दौऱ्याच्या संदर्भात दुसरी सविस्तर अंतिम जाणाऱ्या मराठा समाजाच्या

बैठकीत निर्णय बैठक लवकरच घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. हजारो समाजबांधव आरक्षण योध्दा मनोज जरांगे यांना पाठिंबादेण्यासाठी तुळजापूर तालुक्यातून मुंबईला जाणार आहेत. या संदर्भात रविवारपासून (दि. 14) तालुक्यात विविध ठिकाणी बैठका घेण्याविषयी यावेळी चर्चा झाली. तसेच ग्रामीण

भागात गावोगावी संपर्क साधून नाव नोंदणी करण्याचे नियोजन करण्यात आले.या बैठकीस सज्जनराव साळुंके, बाळासाहेब शिंदे, महेश गवळी, आबासाहेब कापसे, सचिन रोचकरी, अर्जुन साळुंके, जीवनराज इंगळे, अजय साळुंखे, प्रशांत सोंजी, राम चोपदार, सत्यजित साठे, अण्णासाहेब क्षिरसागर  सह मराठा बांधव मोठ्या संखेने उपस्थितीत होते.


 
Top