तुळजापूर (प्रतिनिधी)-जीवात जीव असेपर्यंत मी काँग्रेस पक्षामध्येच राहणार.असे स्पष्टीकरण काँग्रेसचे जेष्ट नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी  काक्रंबा ता.तुळजापूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची चिंतन बैठकीत केले.

सदरील बैठक  युवा नेते ऋषिकेश मगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण बोलताना म्हणाले की माझे पूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये गेलेले आहे. मागील वीस वर्षात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तुळजापूर तालुक्यात विविध विकासकामे करण्यात आलेली आहेत. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने अनेक महत्त्वाची पदे दिली.काँग्रेस पक्षाकडून मला भरभरून मिळालेले आहे.त्यामुळे मी जीवात जीव असेपर्यंत काँग्रेस पक्ष कधीही सोडणार नाही.

 काटी गावचे सरपंच सुजित हंगरेकर यांनी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकीने काम करण्याचे आव्हान केले.  चव्हाण साहेबांच्या माध्यमातून झालेली विकास कामे लोकापर्यंत पोहोचवा. माजी बांधकाम सभापती मुकुंद दादा डोंगरे यांनी सर्व कार्यकर्त्याला अंगातील आळस झटकून काँग्रेस पक्षासाठी पुन्हा मैदानात उतरुन काम करण्याचे आव्हान केले. यावेळी या बैठकीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज भैया पाटील,युवा नेते  ऋषिकेश भैय्या मगर, सावरगाव चे माजी उपसरपंच रामेश्वर तोडकरी, माजी बांधकाम सभापती मुकुंद दादा डोंगरे,जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, , अमोल कुतवळ,जळकोटचे सरपंच अशोक पाटील, दिलीप सोमवंशी, बाजार समितीचे संचालक एडवोकेट रामचंद्र ढवळे,साहेबराव अण्णा जाधव, रसिक वाले,साधू बाबा मुळे, हरीश जाधव, लक्ष्मण शिंदे, गोपाळ गोरे, शितल गोरे,गौरीशंकर कोडगिरे, हमीद पठाण, चनाप्पा मसुते, बाबासाहेब देवकते,चिन्मय मगर, दत्ता मस्के, रवी कापसे, मसल्याचे माजी सरपंच बालाजी नरवडे, सुरेश कोकरे,उमेश तांबे, सुधाकर सगट, संभाजी भोसले,किरण जाधव आमच्या सह तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top