धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय पुरवठा विभाग व रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक  दिन साजरा करण्यात आला. यावेळी धाराशिव येथील अप्पर जिल्हाधिकारी श्री शिवाजी शिंदे हे बोलत होते. आपण सर्वजण ग्राहक आहोत, ग्राहकांचे अधिकार आणि कर्तव्य काय आहेत ?हे आपणाला माहीत असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयात वेगवेगळ्या प्रकारची माहिती देणारे स्टॉल लावलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांनी माहिती घ्यावी असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक धाराशिव येथील जिल्हा पुरवठा अधिकारी सौ.स्वाती शेंडे यांनी केले. ग्राहकांना कायद्याने दिलेल्या  हक्क व अधिकाराची जागरूकता निर्माण करण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.असे त्या यावेळी म्हणाल्या.

सदर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ॲड  देविदास वडगावकर होते.त्यांनी ग्राहकांच्या हक्क व अधिकारावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. ग्राहकांनी नेहमी खरेदी करत असताना सतर्क रहावे असे ते म्हणाले.याप्रसंगी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे किशोर वडणे, मुकुंद सस्ते, ग्राहक संघटनाचे हेमंत वडणे, संपत झळके , अनिल पाटील इत्यादी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वृषाली तीलोरे आणि प्रा. सुप्रिया शेटे यांनी केले. तर आभार तहसीलदार शिवानंद बिडवे यांनी मानले.याप्रसंगी विद्यार्थ्यांना ग्राहकांच्या हक्क व अधिकाराची माहिती देणारे स्टॉल महाविद्यालय परिसरामध्ये लावण्यात आले होते. त्यामध्ये रक्तदाब व साखरेचे रक्तातील प्रमाण तपासण्याचे स्टॉल ,रस्ता सुरक्षा विषयी माहिती देणारे स्टॉल, मोफत आयुष्यमान कार्ड, मागासवर्गीय विकास महामंडळ , प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, प्रधानमंत्री उज्वला योजना, सार्वजनिक आरोग्य विभाग ,अन्न व औषध प्रशासन उद्योग संचालनालय जिल्हा उद्योग केंद्र ,एलआयसी, वैद्य मापन शास्त्र इत्यादींचे स्टॉल लावण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख प्रा.बालाजी नगरे, डॉ.अवधूत नवले, प्रा. सुप्रिया शेटे, डॉ.अमर निंबाळकर, प्रसिद्धी विभागप्रमुख डॉ.मारुती अभिमान लोंढे यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top