धाराशिव (प्रतिनिधी)-2 क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर व जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय लातूर यांच्या सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय युवा महोत्सवात समूह लोकनृत्यात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद धाराशिव शाखेने प्रथम क्रमांक मिळविला आहे. जानेवारी महिन्यात नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवात समूह लोकनृत्य विभागात महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे.
उदगीर येथे 29,30 व 31 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा.संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार सुधाकर शुंगारे, क्रीडा विभागाचे सह संचालक सुधीर मोरे, उपसंचालक युवराज नाईक यांच्या सह आदी मान्यवर उपस्थित होते.
या महोत्सवात राज्यातील विविध विभागातील 900 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात लातूर विभागाने सर्वाधिक 10 पदके मिळवत बाजी मारली आहे.या स्पर्धेतील विजेत्या संघास नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे.
समहू लोकनृत्य विभागात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद धाराशिव (लातूर विभागात प्रथम), तसेच नाट्यराज कला मंडळ मुंबई शहर (द्वितीय), राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली नागपूर विभाग (तृतीय) क्रमांक मिळविला आहे. विजेत्या संघांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा धाराशिव च्या संघामध्ये उत्कर्षा शिंगाडे, अंबिका आगळे, अंकिता माने, तनुजा शिंदे ,कुमारी पोद्दार, वैष्णवी नाटक, दिग्विजय शिंगाडे, प्रसेनजित शिंगाडे, सुहास झेंडे, सुमित चिलवंत, विजय उंबरे,ऋषिकेश गवळी, कु राठोड, विश्वनाथ काळे, आकाश शेंडगे, अक्षय दिवटे, सागर चव्हाण, सुगत सोनवणे, यशवंत शिंगाडे, सुमित शिंगाडे, संकेत नागणे, तेजस शेंडगे यांच्या सह आदी कलाकारांनी सहभाग घेतला. या लोकनृत्याचे नृत्य दिग्दर्शन विशाल टोले यांनी केले. तर गायन सुजित माने, अश्विनी माने यांनी तर मृदंग वादक रमण भोईभार यांनी सहभाग घेतला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद राज्यस्तरीय युवा महोत्सवामध्ये दिंडी लोकनृत्य प्रथम नाट्य परिषदेचे अध्यक्ष विशाल शिंगाडे, प्रमुख कार्यवाह धनंजय शिंगाडे, सल्लागार राजेंद्र अत्रे, अभय शहापूरकर यांनी अभिनंदन केले आहे.