धाराशिव (प्रतिनिधी)-तालुक्यातील वरुडा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त (दि.26) आदिवासी पारधी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सुनील काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी काळे यांच्यावतीने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास वरुडा गावचे उपसरपंच सुनील गंगावणे, शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय कोंढरे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामचंद्र पवार, व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ. संगीता नवनाथ पवार तसेच समितीचे सर्व सदस्य, शाळेतील शिक्षक, कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top