धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिवः रुपामाता अर्बन व मल्टीस्टेटचे चेअरमन ॲड. व्यंकटराव गुंड हे मॉरिशस येथे सहकार क्षेत्राच्या अभ्यास दौऱ्यावर जात आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई व मॉरिशस पतसंस्था फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने दि. 28 जानेवारी ते 02 फेब्रुवारी या कालावधीत या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा कोयते व मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे दौऱ्यात सहभागी असणार आहेत. मॉरिशस येथील साखर उद्योगासह पतसंस्था आणि सहकार क्षेत्रातील कार्यपद्धतीची माहिती जाणून घेण्यात येणार आहे. 28 जानेवारी रोजी रात्री मुंबई येथील विमानतळावरुन ते मॉरिशसला रवाना होणार आहेत. तर 02 फेब्रुवारी रोजी ते परतणार आहेत. मॉरिशस येथे अभ्यास दौऱ्यासाठी जात असल्याबद्दल ॲड. गुंड यांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Related Posts
- संकल्प ते सिद्धी' अंतर्गत धाराशिव भाजपचा जनता दरबार13 Jun 20250
धाराशिव (प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 11 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षातर्फ...Read more »
- शिधापत्रिके संबंधी लाभ घ्यावा13 Jun 20250
भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाचे निर्णयानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव चे मार्गदर्शनाखाली भूम तालुक्यात मंडळ ईट येथील सिद्धेश्वर मंदिर सभागृह...Read more »
- त्या शिक्षकाची तात्काळ बदली करा अन्यथा 17 जूनला भरवणार गटशिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये शाळा ?13 Jun 20250
भूम (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोकेवाडी येथील पदवीधर शिक्षक धनराज परमेश्वर हत्तुरे हे शाळेला सतत गैरहजर राहतात. व्यसन करुन येतात असा आरोप...Read more »
- नीती आयोगाच्या बक्षीसातून 75 शेतकऱ्यांना सिंचनासाठी शेततळ्यांचे वाटप13 Jun 20250
धाराशिव (प्रतिनिधी)- नीती आयोगाच्या 'आकांक्षीत जिल्हा उपक्रमांतर्गत सन 2021 मध्ये धाराशिव जिल्ह्याला प्राप्त झालेल्या बक्षीस निधीचा उपयोग करत जि...Read more »
- धाराशिव आकांक्षित जिल्हा असल्यामुळे निधी बाबत स्थगिती उठवा- पालकमंत्री प्रताप सरनाईक13 Jun 20250
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव हा आकांक्षीत जिल्हा असल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण,महिला व बालकल्याण, जलसंधारण इत्यादी विविध विभागांशी संबंध...Read more »
- श्री संत गोरोबा काका यांच्या वाड्याचा वर्धापनदिन साजरा13 Jun 20250
तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे श्री संत गोरोबा काका यांच्या वाड्याच्या 11 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.यावेळी ह.भ.प.दिपक महाराज खरात...Read more »