धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रीय समाज पक्षाच्या अतिरिक्त जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या निवडी शनिवारी जाहीर करण्यात आल्या. पक्षाचे जिल्हाध्यक्ष बालाजी वगरे यांनी पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, महासचिव माऊली सलगर, मराठवाडा अध्यक्ष विष्णू गोरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य आश्रुबा कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडी जाहीर केल्या.

शहरातील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाध्यक्ष बालाजी वागरे यांनी शनिवारी धाराशिव येथे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. बैठकीत शेख रफिकनूर अहेमद यांची धाराशिव जिल्हा सरचिटणीसपदी, याकुब गुलाब बागवान यांची धाराशिव शहर कार्याध्यक्षपदी, रुक्साना चौधरी महिला आघाडीच्या तुळजापूर तालुकाध्यक्षपदी, हिना इसाक बागवान यांची तालुका उपाध्यक्षपदी तर मुस्कान महेबुब बागवान यांची धाराशिव महिला शहर उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

बैठकीस महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुहासिनी पाटील, धाराशिव तालुकाध्यक्ष सुवर्णा संपत मुंडे, तुळजापूर तालुका युवक उपाध्यक्ष अर्जुन झाडे, महानंदा अंकुशे, विधी न्याय विभाग ॲड. शमशोद्दीन जिलानी सय्यद, धाराशिव तालुकाध्यक्ष सचिन देवकते, शहराध्यक्ष सलीम भाई पठाण, मेजर अशोक गाडेकर, विठ्ठल खटके, विद्याधर क्षिरसागर, आकास सलगर, राजेश मेटकरी, प्रविण खांडेकर आदी उपस्थित होते.


 
Top