धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव व लगतचे जिल्ह्यातील हृदयाचे आजार असलेल्या रुग्णांना मोफत औषधोपचार, इ.सी.जी टू-डी इको ॲनजीओग्राफीसारख्या तपासण्या व ॲनजीओप्लास्टी व बायपासची शस्त्रक्रिया होणार आहे. याचा नक्कीच नागरिकांना फायदा होईल. असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी केले.

धाराशिव शहरात कार्डियाक कॅथलॅबच्या भूमिपूजन प्रसंगी प्रा. डॉ. सावंत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.इस्माईल मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. शिल्पा दोमकुंडवार,डॉ.जुहुर सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण व ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाची नूतन इमारतीचे लोकार्पण आणि ग्रंथोत्सवाचे उद्घाटन केले.यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुधीर आचार्य आणि अनिल सूर्यवंशी यांनी इमारत आणि ग्रंथोत्सवाबाबत माहिती दिली. ग्रंथालय संचालक महाराष्ट्र राज्य अ.मा.गाडेकर,सहायक ग्रथालय संचालक सुनिल,जिल्हा ग्रथालय संघाचे अध्यक्ष व.ग.सुर्यवंशी, कार्यकारी अभियंता चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.


हृदयाची शस्त्रक्रियेची सोय

धाराशिव येथे कार्डीयाक कॅथलॅब युनिट ऑन टर्नकी बेसीस उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी 18 कोटी 2 लाख 43 हजार 820 रुपये इतके अनुदान मंजूर आहे.6 हजार चौरस फुटामध्ये कार्डीयाक युनिट उभारण्यात येणार आहे या कार्डीयाक युनिटमध्ये कॅथलॅब मशीन,ऍडव्हान्स मॉड्युलर सीबीटीएस,ऑपरेशन थिएटर 10 खाटांचे आयसीयू व बाह्यरुग्ण सेवा उपलब्ध असणार आहेत.या प्रकल्पामुळे हृदयाची शस्त्रक्रिया करण्याकरिता अत्याधुनिक प्रकारचे शस्त्रक्रिया ग्रह व गुणांची शस्त्रक्रिया करण्याआधी व झाल्यानंतर रुग्णांचे देखभाल करण्याकरिता प्रशस्त 10 बेडच्या आयसीयू केंद्र शासनाच्या संलग्न असलेल्या नॅशनल ऍक्रेडिटेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल्स यांनी सुचित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार स्थापित करण्यात येणार आहे.यामुळे रुग्णांना चांगल्याप्रकारे आरोग्य सुविधा देण्यास मदत होईल असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.


 
Top