परंडा (प्रतिनिधी) - खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना आहे आणि सर्व 16 आमदार हे पात्र असल्याचा निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.याबाबत निषेध व्यक्त करीत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली नार्वेकर यांचा निषेध करण्यात आला. उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे संतप्त शिवसैनिकांनी राहुल नार्वेकर यांना बांगड्यांचा हार घालत बॅनर जाळत त्यांनी जोडे मारो आंदोलन केले.

यावेळी तालुका प्रमुख मेघराज पाटील, शहर प्रमुख रईस मुजावर, माजी नगरध्यक्ष सुभाष शिंदे, जर्नाधन मेहेर, माजी नगरसेवक संजय कदम, माजी नगरसेवक डॉ. अब्बास मुजावर, माजी नगरसेवक इरफान शेख, युवा सेना शहरप्रमुख कुणाल जाधव, दत्तात्रय धनवे, प्रशांत गायकवाड, संतोष गायकवाड, तुकाराम गायकवाड, तानाजी शिदे, उमेश परदेशी, बालाजी गायकवाड, धनराज पाटील, संतोष मेहेर, लतीफ कुरैशी, ज्योतीराम गायकवाड, गौस कुरैशी, सचिन शिंदे, मुतालिब कुरैशी, राहुल देवळे, जितेश आदी उपस्थित होते.


 
Top