धाराशिव (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी असलेल्या आमदारांना अपात्र करण्याऐवजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करीत त्यांना पात्र केले आहे. हा निर्णय लोकशाहीची गळा दाबून हत्या करणारा असून अत्यंत काळा दिवस ठरला आहे. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्यावतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.10 जानेवारी रोजी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास मोदी व शिंदे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन केले.

यावेळी लोकशाहीचा गळा दाबणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो....शेतकऱ्यांचा गळा दाबणाऱ्या सरकारचा धिक्कार असो.... राहुल नार्वेकरचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय.....या सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय.....उद्धव साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है !.... झिंदाबाद झिंदाबाद.... शिवसेना जिंदाबाद, अशा घोषणा देत मोदीशाहीचा धिक्कार असो या बॅनरला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रमुख प्रदीप साळुंके, शहराध्यक्ष सोमनाथ गुरव, धाराशिव तालुकाप्रमुख सतीश सोमानी, शहर संघटक प्रशांत साळुंके, उपशहर प्रमुख सुरेश गवळी, माजी नगरसेवक तुषार निंबाळकर, बाळासाहेब काकडे, पंकज पाटील, राणा बनसोडे, गणेश खोचरे, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, दिपक जाधव, सुनील शेरखाने, सतीश लोंढे, कलीम कुरेशी, गुट्टु शेख, रोहित निंबाळकर, बालाजी कांबळे, ओमकार बांगर, राजदीप गायकवाड, सुमित बागल, मनोज पडवळ, नवज्योत शिंगाडे, गफारभाई शेख, पांडुरंग भोसले, पिंटू आंबेकर, सत्यजित पडवळ, राकेश कचरे, शिवयोगी चपने, अमित उंबरे, शरीफ शेख, मुजीब काझी, सुधीर अलकुंटे, हनुमंत यादव, निलेश साळुंके, सुनील चौधरी, शहानवाज पठाण,  आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top