उमरगा (प्रतिनिधी)-उमरगा तालुक्यात गुरुवारी (दि 11) येळवशिचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेतात पांडव आणि काळ्या आईची सहकुटुंब मनोभावे विधिवत पुजा शेतकऱ्यांनी वनभोजनाचा आस्वाद घेतला.

तालुक्यातील शेतशिवार माणसांनी फुलून गेला होता. गुरुवारी सकाळ पासूनच शेतात जाण्याची लगबग चालू झाली. अंबिलीचे बिंडगे डोक्यावर घेऊन शेतकरी रस्त्याने चालले होते. अनेकांनी बैलगाडीत बसून शेताचा रस्ता धरला होता. शेतातील झाडां भोवती ज्वारीच्या कडब्याच्या पेंड्या लावून कोपीत पाच पांडव मांडून त्यांना गेरु व चुन्याचा रंग दिला. कडब्याच्या पेंढ्या पासून तयार केलेल्या कोप लालसर रंगाच्या मखमली शालीने बांधली.त्यानंतर डालग्यातून आणलेले सर्व साहित्य कोपी समोर ठेवून पांडवासमोर हिरव्या कापडावर लक्ष्मीची पूजा मांडली. त्यानंतर भजी, वांग्याचे भरीत, ऊस, पेरू, बोरे, शेंगदाण्याचे लाडू, आंबील, आंबट भात, ज्वारी आणि बाजरीचे उंडयाचा नैवेद्य दाखविला. 

 लोटक्यात अंबिल घेवून शेेतातील पिकांत शिंपडत हर बोलो रे भगत राजा जो, हर बोलो, हर हर महादेव, असा जयघोष केला.तालुक्यातील गावात वेगवेगळ्या पद्धतीने जयघोष केला जातो. त्यानंतर मातीच्या नविन माठात ज्वारीचे पीठ, लसून, मिरची व ताकांपासून बनविलेले अंबिल, बाजरीचे उंडे, वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी, आंबट भात, वेगवेगळ्या फळ व पालेभाज्या एकत्रित करून तयार केलेली चुलीवरची भज्जी, गव्हाची खीर, कोंदीच्या पोळ्या अशा विविध प्रकारच्या जेवणावर शेतकऱ्यांनी आप्त परिवार मित्रांनी ताव मारला. शेतकरी सायंकाळी शेणाच्या वाळलेल्या गोवर्यावर मातीच्या किंवा तांब्याच्या लहान भांड्यात दूध व शेवया उतू जाईपर्यंत शिजवतात.  त्यानंतर ज्वारीच्या कडब्याची पेंढी पेटवून हातात पेटत्या पेंढीसह पिका भोवती शेताला प्रदक्षिणा घातली. यामुळे पिकांवर ईगीन अर्थात किडींचा प्रादूर्भाव होत नाही अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. त्यानंतर सर्वजण सूर्यास्ताच्या वेळी आनंदाने घरी परतले.तत्पूर्वी सकाळ पासून सर्व रस्ते वाहने बैलगाडी दुचाकी व पायी चालत जाणाऱ्या महिला पुरुषाच्या गर्दीने फुलून गेले होते. तर काही जण बैलगाडीसह मिळेल त्या वाहनांमधून सर्वजण शिवार गाठण्यासाठी धडपड करताना दिसून येत.

~mOarÀ¶m {nR>mMo C§S>o, ~mOar d ÁdmarÀ¶m H$S>H$ ^mH$ar, gd© àH$maÀ¶m nmbo^mÁ¶m, dQ>mUm, ha^è¶mMo {hado XmUo, ~ogZ ¶mnmgwZ Mwbrda ~Z{dbobr ^‚mr, dm§Jo, H$m§Xm, bgyU nmV d {haì¶m {_aÀ¶m nmgwZ V¶ma Ho$bobo dm§½¶mMo ^arV,JìhmMr Ira, H$m|XrÀ¶m JmoS> nmoù¶m, {IMS>m ¶m {d{dY nXmWm©gh A§{~bmMm eoV {edmamV dZ ^moOZmMm ñdmX KoVbm.


 
Top