भूम (प्रतिनिधी)- भूम शहरात नव्हे तर धाराशिव जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट सूत्रसंचालन करणारे व्यक्तिमत्व म्हणून ज्या व्यक्तीला त्याच्याकडे पाहिले होते. त्या आलिम शेख यांचे सेवानिवृत्त होत असताना माजी आमदार राहुल मोटे यांनी आलिम शेख यांचे तोंड भरून कौतुक करत असताना असे सांगितले की शहरात नव्हे तालुक्यात लोकांच्या मदतीला प्रत्येकाची आत्मीयता जोपासणार असे व्यक्तिमत्व असणारे आलिम शेख यांना  त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल मोटे कुटुंबीयांकडून पुढील आयुष्य शुभेच्छा दिल्या.

भूम येथील बाणगगा शाळेचे शिक्षक अलीम शेख यांचे सेवानिवृत्त दिवस असल्याने बाणगंगा शाळेमध्ये निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेच्या वतीने तसेच राहुल मोटे परिवार सरांवरती प्रेम करणारे मित्र मंडळी विविध पक्षाचे पदाधिकारी यांच्यावतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार राहुल मोटे या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे तालुका अध्यष रुपेश शेंडगे, संस्थेचे सचिव ॲड. मोटे, मुख्याध्यापक लिमकर, शिक्षक भोईटे, गुरुदेव दत्त शाळेचे माजी मुख्याध्यापक ए. के. गायकवाड, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तात्यासाहेब कांबळे,  शिवसेना महिला जिल्हा उपप्रमुख जिनत सय्यद, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अण्णा पाटील, आलिम सरांचे व्याही जावई मुली मुलगा सहपरिवार, पत्रकार, मित्रपरिवार उपस्थित होता.


 
Top