धाराशिव (प्रतिनिधी)-सरस्वती प्राथमिक विद्यालय शिंगोली शाळेमध्ये मुख्याध्यापक कुमंत शिंदे, (आदर्श आश्रम शाळा, शिंगोली) यांचा सेवानिवृत्तीमुळे सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांचा शाल, श्रीफळ, छत्रपतींची प्रतिमा, हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी विस्तार अधिकारी प्रकाश पारवे यांनी त्यांच्या बत्तीस वर्षे सेवेचे कौतुक केले, एक आदर्श शिक्षक व एक आदर्श मुख्याध्यापक म्हणून त्यांच्या कार्याचा  गौरव केला. केंद्रप्रमुख  अनुरथ नागटिळक यांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी शाळेतील शिक्षिका, कर्मचारी, विद्यार्थी, शिंगोली गावचे सरपंच भैय्या शिंदे, संस्थेचे संस्थाचालक  रणखांब सर, गोरे मॅडम, जिल्हा परिषद शाळा किणी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे, सतीश कुंभार , अध्यक्ष, आश्रम शाळा शिक्षक व कर्मचारी संघटना, शिंगोली, गणपत मगर, इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top