भूम (प्रतिनिधी)- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याआगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात भूम तालुक्यामध्ये शिवसेना गाव भेटी अभियान चालू असून यावेळी अभियानास उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भूम तालुक्यातील वारे वडगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सार्वजनिक ठिकाणीबैठकीचे आयोजन केले होते .तसेच कासारी या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये बैठकीच्या आयोजन केले होते.तसेच भूगोलगाव या ठिकाणी मुख्य चौकामध्ये कार्यकर्त्यांनी बरोबर व ग्रामस्थांबरोबर चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन वेगवेगळ्या राजकीय विषयावर चर्चा करून मोठ्या प्रमाणात मताधिक्य देण्याचा वारेवडगांव, कासारी, भोगलगांव गावातील नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी विश्वास दिला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख ॲड. श्रीनिवास जाधवर,युवासेना विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे, उपतालुकाप्रमुख रामभाऊ नाईकवाडी, युवा सेना शहरप्रमुख अविनाश जाधव, युवासेनेचे गोविंदराज शाळू , ॲड विनायक नाईकवाडी, सरपंच परिषद राज्य संघटक कोहिनूर सय्यद माजी शहरप्रमुख दिपक मुळे यावेळी वांगी बुद्रुक येथील शाखाप्रमुख रामदास मेत्रे राहुल माळी शुभम गुंजाळ हनुमंत आवताडे तानाजी सुदाम गुंजाळ विकास वाघमारे यांच्यासह गावातील नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते तसेच वांगी खुर्द येथील माजी सरपंचसंपत काळे, बिभीषण काळे ॲड रमेश काळे, दादा खुळे, महादेव गायकवाड, प्रभाकर गवळी, अंगद कर्णवर, बाळू काळे, सुदाम काळे बबन काळे, यांच्या सह भोगलगांव येथील नागरिक उपस्थित होते.

 कासारी येथील ग्रामपचायत सदस्य तानाजी पाटील ,वारेवडगांव अशोक नलावडे, बाबूराव सपकाळ विकास करवंदे ,दशरथ सपकाळ ,रामहारी पाटील,आश्रूबा करूंदे, धोंडिबा तांबारे, भिमराव भोसले, नाशिक सरपकाळ, लखन गायकवाड, विवेक गोपने, अलम नागटिळक, मनोज नलावडे, शिद्धेश्वर सुपेकर, सुर्यकांत सराटे, विनोद गायकवाड ,रामलिंग भैरट, यांच्या सह नागरिक उपस्थित होते.


 
Top