भूम (प्रतिनिधी)-दस्तगीर पठाण लिखित 'भावलेली माणसं' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखदार स्वरूपात गुरुदेव दत्त हायस्कूल ,भूमच्या भव्य प्रमाणात संपन्न झाला. या पुस्तकात दस्तगीर पठाण  यांना 'भावलेली माणसं' शब्दरूपात साकारली गेली आहेत. या पुस्तकासाठी प्रस्तावना माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी सौ. सुधा साळुंके यांनी दिलेली आहे. तर अभिप्राय प्रसिद्ध साहित्यिक प्रा.अरविंद हंगरगेकर यांनी दिलेला आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठ लातूर येथील चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश सातपुते यांनी साकारले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध अशा समग्र प्रकाशन या संस्थेने केले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी मुख्याध्यापक गायकवाड अरुण यांनी केले. लेखक दस्तगीर पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे प्रा.विशाल गरड यांनी आपल्या प्रगल्भ वाणीतून वाचनाचे व लेखनाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून भूमचे गटशिक्षणाधिकारी श्री.भट्टी साहेब हजर होते. कार्यक्रमासाठी भूम- परंडा- वाशीचे मा.आमदार श्री राहुल भैया मोटे आपल्या गिरवली गावातील नवोदित लेखकाला प्रोत्साहन देण्यासाठी खास करून उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष व्यंकट (अण्णा)मोटे व संस्थेचे सचिव श्री. सतीश देशमुख सर तसेच संस्थेचे उपाध्यक्ष विजय मोटे, कोषाध्यक्ष डॉ. महादेव अंधारे, संस्थेच्या संचालिका श्रीमती खोसे दमयंती व इतर सर्व संचालक मंडळ उपस्थित होते तसेच माजी बांधकाम सभापती प्रतापदेशमुख, सोन्नेवाडीवाडीचे सरपंच सतीश सोन्ने, गिरवलीचे सरपंच संजय मोटे, गिरवलीचे पोलीस पाटील जावेद पठाण, स्थानिक गुन्हे शाखेचे शौकत पठाण व लेखक दस्तगीर पठाण यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, माजी- आजी विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकसेवा हायस्कूल गिरवलीचे मुख्याध्यापक हरिदास डोके व सर्व कर्मचारी, गुरुदेव दत्त हायस्कूल भूम चे मुख्याध्यापक दत्ता भालेराव व सर्व कर्मचारी तसेच श्री. गुरुदेव दत्त प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ.मुंडे अंजना व सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रसिद्ध निवेदक श्री.अलीम शेख यांनी केले तर आभार मुख्याध्यापक हरिदास डोके यांनी मानले.


 
Top