तेर (प्रतिनिधी)-प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच राज्यभरातील लाखो भाविक भक्तांसह नागरिकांचे श्रध्दास्थान असलेल्या संतश्रेष्ठ श्री संत गोरोबा काकांच्या तेरनगरीत प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी तेर ग्रामस्थांच्या वतीने दिनांक 1 ते 7 फेब्रुवारी या कालावधीत संत गोरोबा काका मंदिरासमोरील प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्यात दररोज दुपारी 2 ते 5 या वेळेत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्यभिषेक सोहळ्यानिमित्त आंतरराष्ट्रीय शिवचरित्र व्याख्याते राजगड हभप रोहिदास महाराज हांडे यांच्या मधूर वाणीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचे निरुपण होणार आहे. 

तसेच दररोज रात्री 8 ते 11 या वेळेत राज्यभरातील नामवंत कीर्तनकाराची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे यामध्ये दिनांक 1 समाज प्रबोधनकार नातेपुते हभप सागर महाराज बोराटे, दिनांक 2 युवा व्याख्याते बीड हभप अविनाश महाराज भारती, दिनांक 3 विनोदाचार्य परभणी हभप पांडुरंग महाराज उगले, दिनांक 4 राष्ट्रीय शिवशंभू व्याख्याते कराड हभप कबीर महाराज अत्तार, दिनांक 5 शिव व्याख्याते किल्ले शिवनेरी हभप निलेश महाराज कोरडे, दिनांक 6 कूट अभंग प्रवक्ते बीड महादेव महाराज राऊत , दिनांक 7 रोजी समाज प्रबोधनकार आळंदी (देवाची) हभप संग्राम (बापू) महाराज भंडारे पाटील यांच्या कीर्तन सेवेचा गजर तेरणेच्या काठी सात दिवस घुमणार आहे तर गुरुवार दिनांक 8 रोजी हभप रोहिदास महाराज हांडे यांची 10 ते 12 या वेळेत काल्याची कीर्तन सेवा संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सप्ताह निमित्त दररोज काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, गाथा पारायण, भोजन विश्रांती, छत्रपती शिवाजी महाराज शौर्यगाथा, हरिपाठ,  भोजन, हरिकीर्तन, हरिजागर, आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांसह शिवप्रेमी नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज शौर्यगाथेसह हरी कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक समितीसह तेर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top