भूम (प्रतिनिधी)-युवादर्पण या दिनदर्शिकेचे धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते भूम येथील पंचायत समिती सभागृहात लोकार्पण संपन्न झाले.

सदरील दिनदर्शिकेत जिल्ह्याचे खासदार व तसेच कळंब -धाराशिव मतदार संघाचे आमदार श्री कैलास दादा पाटील यांनी केलेल्या कामकाजाचा थोडक्यात लेखाजोखा व्यक्त केलेला आहे, व तसेच डॉ.चेतन बोराडे यांनी स्वतः युवासेना जिल्हाप्रमुख तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख या पदाची जबाबदारी स्वीकारत असताना केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा सुद्धा थोडक्यात मांडलेला आहे. दिनदर्शिकेमध्ये सर्व सण, महापुरुषांच्या जयंती व तसेच  शास्त्रा प्रमाणे मराठी पंचांग सुद्धा समाविष्ट आहे. सर्व अद्यावत माहिती दिनदर्शकेत असल्यामुळे युवादर्पण ही दिनदर्शिका सर्वांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास जिल्ह्याचे खासदार ओम दादा यांनी व्यक्त केला.

जवळपास 5000 प्रति युवा दर्पणच्या छापल्या असून,भूम परंडा वाशी तालुक्यात त्याचे वाटप होणार असल्याचे युवासेना तालुकाप्रमुख सुधीर ढगे यांनी सांगितले. या दिनदर्शिका लोकार्पणाचा कार्यक्रमास डीसीसी बँकेचे उपाध्यक्ष श्री मधुकर भाऊ मोठे,शिवसेना जिल्हाप्रमुख श्री रणजीत पाटील,तालुकाप्रमुख श्रीनिवास जाधवर,मेघराज पाटील,हनुमंत पाटोळे,संजय पाटील आरसुलीकर,महिला आघाडी जिल्हा संघटक जिनत सय्यद,उमाताई रणदिवे,विधानसभा युवा अधिकारी प्रल्हाद आढागळे, वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तात्या गायकवाड, प्रकाश आकरे, अविनाश जाधव, दीपक मुळे, विनायक नाईकवाडी, रामभाऊ नाईकवाडी,जावेद तांबोळी, राजाभाऊ नलावडे, बापूसाहेब कावळे, तात्या कांबळे, बळीराम गटकळ,उमेश परदेशी,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक व तसेच दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी सहकारी पक्षातील प्रमुख नेते आधी उपस्थित होते.


 
Top