भूम (प्रतिनिधी)-मनोज जरांगे यांच्यासह मराठा समाजाच्या मागण्या शासनाने मान्य केल्या व शासनाने 'सगेसोयरे' शब्दासह दि.27 रोजी पहाटे अध्यादेश काढला. यावेळी मुंबई येथे जे मराठा समाजातील आंदोलक मनोज जरांगे यांना समर्थन करण्याकरिता गेले होते ते दिनांक 28 रोजी भूम शहरात परतले. या मराठा समाज बांधवांचे यावेळी शहरातील समाज बांधवांच्या वतीने गुलाल व भगवा रंग उधळत शहरात स्वागत करण्यात आले. 

यावेळी डॉल्बी लावून मराठा समाज बांधवांनी जल्लोष साजरा केला. शहर व तालुक्यातील जे मराठा समाज बांधव गेल्या चार महिन्यांपासून आरक्षण लढाईत सहभागी झाले होते. त्यांनी केलेल्या कष्टाचे चीज झाल्याची भावना व्यक्त केली. मराठा आरक्षणाकरिता सर्वच समाजांनी यावेळी सहकार्य केले असल्याचे यावेळी मराठा समाज बांधवांनी माध्यमांशी बोलून दाखवले. यावेळी मिरवणुकीत सकल मराठा समाजातील बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.


 
Top