धाराशिव (प्रतिनिधी)- येथील नूतन प्राथमिक विद्यामंदीर मध्ये राजमाता जिजाऊ मॉसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदिपकुमार गोरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून  कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी  शिवकुमार  लगाडे, रविकुमार मुळे ,ज्ञानेश्वर कोळगे, प्रवीण गोरे, श्रीमती सारिका उमरकर,श्रीमती यमुना जाधवर,श्रीमती शितल उटगे,श्रीमती दिपाली राऊत, श्रीमती चित्रा सोनटक्के, श्रीमती अश्विनी बुकन, कुमारी अंजली कुलकर्णी यांची उपस्थिती होती. वेशभूषा  स्पर्धेत प्रशालेतील 182 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला या प्रसंगी स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटपही  करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  रामराजे पाटील यांनी केले.तर आभार प्रदर्शन  संतोष माळी यांनी केले.


 
Top