धाराशिव (प्रतिनिधी)- श्रीपतराव भोसल हा यस्कूल येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून इयत्ता सहावी विभागातर्फे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. बाल वयापासूनच विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे, आपण स्वतःहून तयार केलेल्या खाद्य पदार्थाच्या  विक्रीचा आनंद मिळावा, पुढे चालून विद्यार्थ्यांमध्ये कामाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. 

या मेळाव्याचे उद्घाटन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  सुधीर  पाटील, प्रशालेचे मुख्याध्यापक  एस. एस. देशमुख, उपमुख्याधापक एस. बी. कोळी  यांनी सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन, फीत कापून आणि दीप प्रज्वलन करून केले. यावेळी पर्यवेक्षक के वाय .गायकवाड, डी.ए. देशमुख  उपस्थित होते. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी आर.बी. चौधरी, ए.बी.शेरकर, पी. ए. जाधव, ए. एल. चंदनशिवे, पी. आर. गावित,  ए. डी. देवकुळे, ए. एच. मंडोळे, सी.बी. कवितकर, श्रीमती एस. एम. शिंदे, श्रीमती ठाकूर, पी. एस. मोरे,  एम.आर. शेख,  एम.एस. पाटील  यांनी परिश्रम घेतले.


 
Top