धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे (दि.26)  75 वा  प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला. आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या हस्ते  ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. ध्वजा रोहनानंतर राष्ट्रगीत गायीले गेले व भारत माता की जय असा जयघोष करण्यात आला.उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे, महिला जिल्हा कार्याध्यक्ष अप्सरा पठाण, महिला तालुकाध्यक्ष रंजना भोजने,जिल्हा सरचिटणीस महेश नलावडे,अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस खालील पठाण, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद खान पठाण,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर,सेवा दल विभाग जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव,समयोदीन माशायक,सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत शिंदे,सामाजिक न्याय प्रदेश सरचिटणीस सचिन सरवदे, सामाजिक न्याय मराठवाडा उपाध्यक्ष विवेकानंद साळवे, तालुका उपाध्यक्ष नितीन चव्हाण, विद्यार्थी जिल्हाकार्याध्यक्ष प्रतीक माने,तालुका संघटक कलीम शेख,शहर उपाध्यक्ष अल्ताफ मुजावर, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अरफात काझी,अल्पसंख्यांक शहर कार्याध्यक्ष समीर खातीब,सामाजिक न्याय विभाग सरचिटणीस राजाभाऊ जानराव,ओबीसी विभाग जिल्हा सचिव प्रा.नारायण तुरूप,धाराशिव ओबीसी तालुकाध्यक्ष लक्ष्मण राऊत,सा.न्याय महीला शहर कार्याध्यक्ष सुनीता कदम,केशेगाव जि.प गटप्रमुख लिंबराज लोखंडे, आंबेजवळगा जि.प गटप्रमुख सुरेश राठोड,पाटोदा गण प्रमुख विकास गायकवाड, राणी आगळे, सुलोचना जाधव, संगीता शिंदे, उषा लंगाडे, वनिता शिंदे,अमित राऊत, चंद्रकांत राठोड,विश्वनाथ बागल,लतीफ शेख, रविंद्र सोनवणे,चंद्रकांत घसाडे, आदी पदाधिकारी कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.


 
Top