धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये 75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रशालेचे प्राचार्य साहेबराव देशमुख व मान्यवरांच्या  हस्ते महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर प्राचार्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्र राज्य गीत झाले त्यानंतर एन .एन सी. कॅडेट व स्काऊट गाईड- रेंजर्स रोवर या चमूने राष्ट्रध्वज व मान्यवरांना मानवंदना दिली त्यानंतर सहावीच्या विदयार्थ्यांनी वारकरी सांप्रदायाचे वैभव असलेली वारकरी दिंडी च्या सादरीकरणाने  प्रेक्षकांची मने जिंकली. या विद्यार्थ्यांनामार्गदर्शन श्रीमती संगीता शिंदे व श्रीमती ठाकूर एम.पी. यांचे लाभले  त्यानंतर राष्ट्र भक्तीपर गीतांचे गायन प्रशालेतील संगीत शिक्षक महेश पाटील व त्यांच्या बालचमूने सादर केले. 

 यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील, संस्था सरचिटणीस प्रेमाताई पाटील , प्रशासकीय अधिकारी तथा संस्था संचालक आदित्य पाटील , युवा उद्योजक अभिराम पाटील,राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त वाय . के .पठाण , संस्था संचालक पी.एल .गाडे, अरुण बोबडे तसेच संस्था संचालक संतोष कुलकर्णी , उपप्राचार्य संतोष घार्गे , उपमुखाध्यापक सिद्धेश्वर कोळी, पर्यवेक्षक वाय. के . इंगळे , पर्यवेक्षक- एन. आर. नन्नवरे, टी.पी.हाजगुडे, के.वाय.गायकवाड, आर. बी. जाधव, सुनील कोरडे, धनंजय देशमुख, प्रा. विनोद आंबेवाडीकर, श्रीमती बी. बी गुंड, ज्ञानेश्वर पवार, वैभव काशिद सह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने पालक यावेळी उपस्थित होते.

 मंचावरील मान्यवरांच्या हस्ते गुरुवर्य के.टी. पाटील सर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर या वर्षातील सुवर्ण पदक प्राप्त राष्ट्रीय खो-खो खेळाडूंना यावेळी सत्कारीत करण्यात आले. मानवी मनोऱ्याचे सादरीकरण ए. व्ही. शेंडगे यांच्या मार्गदर्शना खाली विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यानंतर इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अंगातील विविध प्रकारच्या कलेचे सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. सी. पाटील, संदीप जगताप, जे.बी. मस्के यांनी केले व सांस्कृतिक कार्यक्रमातील गीतांचे परिक्षण कलाध्यापक एस.डी. वाघ, शिवाजी भोसले, वीर वैभव यांनी केले. एल.जी. साळुंके, विक्रम सांडसे यांच्यासह सर्व क्रीडा शिक्षकांनी सहकार्य केले. तर शेवटी सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा पर्यवेक्षक- एन.एन.गोरे यांनी सर्वांचे आभार मानले. तर वंदे मातरम्‌‍ या गीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.


 
Top