तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होत मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आयोजीत नोंदणीस मोठा प्रतिसाद लाभत आहे. तुळजापूर तालुक्यातील मराठा समाज बांधव महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी  मातेचे दर्शन घेवुन काही जण आंतरवलीकडे तर काही थेट मुंबईकडे जाणार आहेत. 

मराठा आंदोलनात सहभागी होण्यासाठी सुरु करण्यातआलेल्या नाव नोंदणी कार्यालयाचे उदघाटन श्रीतुळजाभवानी पुजारी मंडळ मंगल कार्यालयात धाराशिव येथुन महारँली तुन तिर्थक्षेञी आलेल्या  मराठा बांधवांचा हस्ते करण्यात आले होतो तेव्हा पासुन मराठा समाज बांधव स्वताहुन नावनोंदणी साठी कार्यालयात गर्दी करीत आहेत. तीर्थक्षेत्र तुळजापूर तालुक्यातून मुंबईला आंदोलनात सहभागी होण्यासाठी तुळजापूर शहरासह पंचक्रोषीतील आपसिंगा मोर्डा, काक्रंबा, ढेकरी, सिंदफळ, माळुंब्रा, सुरतगाव, सांगवी मार्डी, तामलवाडी येथील मराठा समाज बांधनी नाव नोंदणी केली आहे. तसेच नळदुर्ग, जळकोट, काटी, सावरगाव या गावातुन निघणारा मराठा समाज बांधव थेट सोलापूरात ऐकञित येवुन तेथुन लाखोचा संखेने मुंबई कडे मार्गस्थ होणार आहे. तिर्थक्षेञ तुळजापूर येथुन हजारोचा संखेने युवक मुंबईकडे पायी रवाना होणार असुन असल्याची माहिती सकल मराठा समाज मराठी क्रांती समन्वयक  ठोक मोर्चाच्या समन्वयकांनी दिली आहे. या पायी वारीच्या नियोजना साठी सज्जन सांळुके महेश गवळी, कुमार टोले, धैर्यशील कापसे, जीवन इंगळे, प्रशांत सोंजी प्रशांत अपराध, सत्यजीत तांबे  अण्णासाहेब क्षिरसागर अदिसह सकल मराठा बांधव परिश्रम  घेत आहेत .


 
Top