तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर पासुन  अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या काक्रंबा काक्रंबावाडी या ग्रुपग्रामपंचायत मधील दहा ते बारा हजार ग्रामस्थांना प्रशाषणाचा दुर्लक्षितपणामुळे 1972पेक्षाही  गंभीर  पाणीटंचाईस सामोरे जावे लागणार आहे 

काक्रंबा साठवन तलावातुन अवैध बेसुमार पाणी उपसा तर चालुच आहे. तसेच जलजीवन काम ही संथ गतीने चालु आहे. या झालेल्या कामाचा दर्जा बाबतीत ग्रामस्थ साशंकता व्यक्त करीत आहेत. जलजीवन कामाची पाईपलाईन टाकताना सिमेंट रस्ते उखडले आहे ते तसाच ठेवले आहेत दबाई न केल्याने ग्रामस्थांना मार्गक्रमण करताना गेली अनेक महिन्या पासुन ञास सहन करावा लागत आहे.अपुर्ण कामामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईस सामोरे जावे लगणार आहे.

याला कारण प्रशासनातील अधिकारी कर्मचारी वर्गाची चालढकल दुर्लक्षित पणा कारणीभुत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधुन केला जात आहे. या दुर्लक्ष पणा मागे काय गुपीत दडलय या बाबतीत चर्चा गावात चर्चिली जात आहे.विरोधीपक्ष असलेल्या  शिवसेना उबाटाचे ग्रामपंचायतसदस्य नेते चुप्प बसत असल्याने या पक्षा च्या नेत्यांन बाबतीत गावातुन नाराजी व्यक्त  होत असुन याचा फटका लोकसभा निवडणुकीत खा निंबाळकर यांना बसण्याची शक्यता आहे. काक्रंबा गावास  काक्रंबा साठवण तलावातुन पाणीपुरवठा होता माञ यातुन बेसुमार पाणी ऊपसा चालुच आहे. या बाबतीत सरपंच यांनी आवाज उठवुन ही त्याची दखल प्रशाषण घेत नसल्याने आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी या प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

 हा पाणी उपसा तिथे अधिकारी कर्मचारी जावुन ही रोखण्यास असमर्थ ठरले असुन अधिकारी कर्मचारी पथक जावुन आल्यानंतर तिथे सध्या दुप्पट मोटारीने पाणी चोरी चालु आहे. अधिकारी या तलावातील अनाधिकृत पणे पाणी उपसा करणाऱ्यांन वर कारवाई का करीत नाही कारवाईस विरोध करणाऱ्यांना  शासकिय कामात अडथळा केल्या प्रकरणी तक्रार का केली जात नाही असा प्रश्न ग्रामस्थांना पडला. कारवाई होत नसल्याने इतर शेतकरी काढलेल्या मोटारी पुन्हा तलावात टाकत आहेत.


 
Top