धाराशिव (प्रतिनिधी)-महायुतीच्या मेळाव्याचा प्रतिसाद पाहून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे ते भाजपवर टिका करीत आहेत. ओमराजे खासदार म्हणून पहिल्यांदा निवडून आल्यानंतर पहिल्या भाषणात त्यांनी मोदीमुळेच आपण खासदार झालो असे सांगत भाषणात मोदींचा अनेक वेळा उल्लेख करून जप केला. अशी खरमरीत टिका धाराशिव लोकसभा संयोजक व भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे यांनी पत्रकार परिषदेत केली.

19 जानेवारी रोजी सायंकाळी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत भाजपचे रामदास कोळगे, नेताजी पाटील उपस्थित होते. पुढे बोलताना नितीन काळे यांनी ओमराजे यांनी बेछुट आरोप करण्यापूर्वी आपण एकदा आमदार, एकदा खासदार झालोत ठोस असे काय काम करून दाखविले त्यांचे आत्मचिंतन करावे असा टोलापण नितीन काळे यांनी लगावला. 72 शेतकऱ्यांचे बँकेच्या कर्जप्रकरणात एका शेतकऱ्याने कोणामुळे आत्महत्या करीत आहोत त्याचे नाव लिहून आत्महत्या केली. तेरणा कारखान्यामधील 400 कोटींचा माल कोठे गेला? शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी कोणी ओतले? आदी प्रश्न उपस्थित करत नितीन काळे यांनी ओमराजे यांच्यावर टिका केली. रेल्वेच्या प्रश्नाबाबत बोलताना युती सरकार आल्यापासून या रेल्वे मार्गाला गती आली. शेतकऱ्यांच्या जमीनबाबत योग्य मावेजा मिळण्यासाठी काही वकीलांचे बोर्ड तयार केले असेही काळे यांनी सांगितले. 


 
Top