सर्व ध्ार्म समीव चे सुफी संत, श्री. ख्वॉजा शम्सोद्दीन गाजी 8रहे.) हिंदू धर्मातील साधु संतानी सर्व धर्मामध्ये मानवतेचा संदेश देऊन सर्व जाती धर्मामध्ये ऐक्या निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्याप्रमाणे भारतामध्ये इस्लाम धर्माचा शांततेचा व समानतेचा विचार रूजविण्याचे काम इस्लाम धर्माच्या सुफी संतानी स्वत:च्या परिवाराचा त्याग करून हिंदू मुस्लीम व इतर धर्मीयात सलोखा, शंती एकतेचा प्रचार व प्रसार करून परिवर्तन घडवून आणले. या क्रांतीकारक विचाराममध्ये हजरत ख्वॉजा शम्सोद्दीन गाजीचे स्थान प्राप्त झाल्यामुळे हिंदुस्थानात जे काही धर्मा-धर्मात ऐक्या दिसते त्याचा हा परिणाम होय म्हणूनच ख्वॉजा साहेब हे राष्ट्रीय एकात्मता व अखंडचे प्रतिक आहेत.

ख्वॉजा शम्सोद्दीन यांचा जन्म दहेमुन खुरासान ऊजबेकिस्तान येथे 27 रमजानच्या महिन्यात 642 हिजरी 1242 ई. शुक्रवारच्या रात्री झाले. ख्वॉजा शम्सोद्दीन साहेबांना दोन भाऊ ख्वॉजा सय्यद अजीजोद्दीन हुसैनी व हजरत ख्वॉजा सय्यद मझरोद्दीन हुसैनी मध्ये ख्वॉजा साहेबांच्या वडिलांचे नाव हजरत ख्वॉजा सय्यद शाह अब्दुल रहेमान हुसैनी दहेमुन खुरासानी व मातोश्री माजेदा बेगम ख्वॉजा साहेब आपल्या मातोश्रीच्या गर्भा अवस्थेत असतानाच आईना पैगंबराच्या धर्मपत्नी उम्मुलमोमीनीन हजरत सय्यदा खुतेजतुल कूबरा व सय्यदा आयशा सिद्दीका व मुलगी सय्यदा फातेमा जोहरांना पाहिले व त्यांनी मुलाची श्ुाभवार्ता दिली व हजरत मोहम्मद पैगंबर (स.) यांनी त्यांचे वडील अब्दुल रहेमान साहेबांच्या स्वप्नात दर्शन देवून मुलगा होण्याची शुभवार्ता दिली व शुभ आशिर्वाद दिले. ख्वॉजा साहेबांचे मुळ नांव हजरत ख्वॉजा सय्यद शाह अहेमद हुसैनी दहेमुन खुरसानी असे आहे जे पैगंबर मोहम्मद मुस्तफा (स.) च्या नावाने ठेवलेले आहे.

शिक्षण व पालन:- वडिलांनी खुतबूल आखताब हजरत ख्वॉजा बाबा हमीदोद्दीन समरखंदीच्या सेवेत सादर केले. त्यावेळी हजरत ख्वॉजा शरफोद्दीन पण होते. ख्वॉजा साहेब जन्मत:च वली व जन्मजात बुध्दीवंत होते व त्यावेळी हया दोन्ही सुफी संतानी ख्वॉजा साहेबांना जवळ बोलावून त्यांच्या कपाळाचे स्पर्श (चुंबन) घेवून म्हणाले की, हा मुलगा सुर्यासारखा तेज प्रकाश देणारा व सर्वांना शांतीचा व प्रेमाचा संदेश देणारा ठरेल म्हणून त्यांना शम्सोद्दीन ही पदवी प्रदान केली गेली व त्यांच्या आई स्वत: त्यांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष देत असत.

कुराणाचे पाठांतर:- ख्वॉजा साहेबांचे कुराणाचे पठव व शिक्षण आपल्या घरीच व आपल्या वडिलांकडून घ्ोतली व व्याच्या 11 व्या वर्षी कुराणाचे संपूर्ण पाठांतर केलेतपस्या व देवाचा आदर:- ज्यावेळेस आई देवाच्या प्रार्थनेत विलीन होऊन जिवंत पणाचा भास सुध्दा होत नसत हे पाहुन ख्वॉजा साहेब पण घराच्या एका कोप-यात जावून देवाची प्रार्थना करून स्वत:ही विलीन व देवाशी समरस होत व जागाच्या शांती व मानवाच्या सुख व संपन्नतेसाठी प्रार्थना

करीत असतफिख्वॉह व मसलक (शरियतचा आदेश व माहिती):- दस्तुर पंथ ख्वॉजा साहेबांचा फिख्वॉह व मसलक व हनफी आहे. आपण इमामे आजम

अबु हनिफाचे फिख्वॉह व मसलक पंथीय आहेत. शरियतची पैरवी:- बाह्य व आतील प्रगती आणि साधवीपणे व साधे जिवन जगत असताना देवाची साधना व पतस्या करीत असत. कारण मोक्ष प्राप्ती करिता देवाच्या आदेशाचे पालन करणे जरूरी आहे ते म्हणजे मानवता, धर्माचे पालन, शांती व दुस-या धर्माचा सादर माणुसकी कारण जगातील सर्व मानव हे देवाची लेकरं आहेत हाच एकमेव उद्देशप्रवासाची सुरूवात:- वडिलांच्या समाध्ाीवर प्रार्थना केल्यानंतर आपल्या

वडिल भावाला दहेमुन मध्येच सोडून दुस-या भावाला सोबत घेवून 641 हिजरी दि. 1271 इ. मध्ये इस्लाम धर्मातील समतेचा व शांततेचा, मानवतेचा धर्माच्या प्रसार व प्रचारासाठी प्रवासाची सुरूवात केलीहज:- 660 हिजरी 1262 इ. मध्ये हजरत सय्यद शाह अहेमद हुसैनी उर्फ शेरेनशाह वली लखब हजरत ख्वॉजा शम्सोद्दीन गाजीने आपल्या मध्ावे भाऊ ख्वॉजा सय्यद शाह मझहरोद्दीन हुसैनी सोबत पहिला हज केला व त्या ठिकाणी बरेच अनुयायींनी शिष्यत्व प्राप्त केले व मदिनामध्ये पैगंबराच्या समाध्ाीवर हजेरी दिली व तेथेही शिष्य होणेसाठी त्यांच्या हातावर बैत केली व तेथून मक्काला आले व बैतुल मुकद्दल (जेरूसलेम) येथे जियारत केली व तेथुन जॉर्डन, शाम, इराक, इराण, अफगाणीस्तान, लाहोर, मुलतान, औच असा इस्लाम ध्ार्मांसाठी प्रवास करीत हिंदुस्तानातील दिल्ली येथे पोहचलेत्यावेळी दिल्लींच्या तखतावर सुलतान गयासोद्दीन बलबन होतानोकरी:- सुलतान गयासोद्दीन बलबनच्या दरबारी दिवाण ूया हुद्यावर विराजमान झाले व ब-याच वर्ष्ाापर्यंत नोकरी करीत असतांना देवांच्या आज्ञाने लोकांची सेवा व देवाच्या आज्ञाचे पालन केले दहा वर्ष्ा या दुद्यावर राहिलेसुलतानुल मशायक हजरत ख्वॉजा सय्यदना निजामोद्दीन औलिया कडे हजेरी :- औलिया निजामोद्दीन चिश्तीच्या भेटीनंतर त्यांना दक्कनकडे

कुच करण्याचे व ध्ार्माचे प्रचार व प्रसारासाठी आज्ञा दिली. लग्न:- हजरत निजामोद्दीन औलियांनी ख्वॉजा साहेबांना लग्न करण्याचा सल्ला दिली व हजरत निजामोद्दीन औलियाच्या जवळचे अनुयायी ख्वॉजा मौलाना सय्यद अब्दुल करीम हुसैनी यांना विनंती केली व त्यांची मुलगी सय्यद खुदेजाशी लग्न लावले, त्यावेळेस त्यांचे वय 43 वर्ष्ााचे होते खिलाफत दिल्यानंतर (शिष्य):- खिलाफत दिल्यानंतर हजरत निजामोद्दीन औलियांनी धार्मीक प्रसार व प्रचाराचा आज्ञा दिला तो काळ खिलजीचे वंशज हजरत सुलतान जलालोद्दीन फेरोज खिलजी 687 हिजरी 1291 इ. चा होतागाजीचा लकब (पदवी):- सय्यदना निजामोद्दीन औलिया महेबुबी इलाही हुसैनी चिश्ती दहेलवी यांच्या सेवेत राहुन एक पुस्तक लिहीले व त्यांच्या आदेशानुसार निरनिराळया भावांचा धार्मिक प्रवास केला. जळगांव, बु-हानपूर या प्रवासात मौलाना हमदोनद्दीन दिडशे माणसासोबत प्रवास करीत असतांना एक विरोध्ाा पंथाबरोबर वादविवाद झाला. तेंव्हा मौलाना हमीदोद्दीन यांनी विरोधी लोकांशी इस्लामच्या प्रसारासाठी जेहाद केला व 4 तासाच्या विवादानंतर ही मोहिम शिताफीने ख्वॉजा शम्सोद्दीन यांनी सर केली व हमीदोद्दीन सोबत पुढच्या प्रवासासाठी रवाना झाले. त्याच वेळी ख्वॉजा हमीदोद्दीन सोबत पुढच्या प्रवासासाठी रवाना झाले. त्याच वेळी

ख्वॉजा हमीदोद्दीननी ख्वॉजा साहेबांची बहादुरी पाहून गाजी हे लगत बहाल केले. तो उल्लाऊद्दीन खिलजीचा काळ हेाता. शेरेनशाह वलीचा लकब:- एक दिवस मी काबाची प्रदक्षिणा घ्ाालीत असताना संपूर्ण पणे प्रार्थनेत गकै असतांना त्यावेळी पकडून झिंजोडले व खॉजा साहेब बेश्ुाध्द झाले त्या वेळेस त्यांनी पाहिले की, हजरत सरवरे कायनात पैगंबर यांनी आपले हात ख्वॉजा साहेबांचया चेह-यावर ठेवले व त्यांच्या कपाळाला बोसा (कपाळाला स्पर्श) घ्ोतला आणि ख्वॉजा साहेबांच्या समोर सय्यदना निजामोद्दीन औलिया होते व त्यांनी ख्वॉजा साहेबांकडे पाहून फर्मतिले की, अय शम्शोद्दीन हुजूर सरवसे कायनात (स.) नी तुम्हास शेरेनशाहची लकब दिला. शेरेनशाह वली आपल्या सोबत सामील झाले, कयामत (प्रलय) होईपर्यंत ख्वॉजासाहेब याच नावाने प्रसिध्द राहतीलउस्मानाबादला जाण्याचे आदेश:- मदिना येथे राहत असतांना मोहम्मद पैगंबर (स.) च्या रोजे मुबारक (समाध्ाी) वर ध्यानस्थ असतांना पैगंम्बरांनी

आज्ञा दिली की, हिदुस्थानातील दक्कनच्या प्रातांतील मौजे उस्मानाबाद येथे येथे इस्लामच्या प्रसारासाठी जावे व या मार्गाची दिशाही दर्शविली. तेथील परिस्थितीचा आढावा ही दिला, पैगंबराच्या आदेशानुसार 710 हिजरी दिनांक 1310 इ. रोजी हिदुस्थान येथे इस्लाम ध्ार्माचा प्रसार व प्रचाराच्याप उद्देशाने रवाना झाले. मक्का व मदिनाच्या नंतर सहकुटँब दिल्ली येोि आले व पीरो मुरशद हजरत ख्वॉजा सय्यद निजामोद्दीन औलियांची खानखाह (ध्ार्मस्थळ) येथे काही दिवस थांबुन नंतर त्यांच्या मुरशदनी मदिना येथे पैगंबरानी दिलेल्या आदेशाची आठवण करून दिली व दक्कम प्रांतातील उस्मानाबाद येथे जाण्याचा हुकूम सादर केला. ख्वॉजा शम्सोद्दीन सहकूटूंब व जवळचे मित्र दिल्ली पासून दक्कनकडे रवाना झाले. दौलताबाद, खुलताबाद येथे काही दिवस मुक्काम करून तेथील लोकांना इस्लाम धर्माचे शिक्षण देत व घ्ोत राहिले. त्यानंतर उस्मानाबाद येथे जाण्याच्या उद्देशाने नळदुर्ग येथे पोहचले. बराच काळ तेथे काढल्यानंतर उस्मानाबाद येथे येणेसाठी सांजा येथे ाव टाकला व नंतर उस्मानाबाद येथे येवून कायम येथे वास्तव्य करून या पंच क्रोष्ाीला पावन केले, याठिकाणी इस्लाम धर्माचा प्रसार करीत असतांना त्यांना खूप त्रास सहन करावा लागला व इस्लाम धर्माचा प्रसार सर्व धर्मियांना शांतीचा व मानवतेचा संदेश देवून सर्व धर्मामध्ये ऐक्या निर्माण करून राष्ट्रीय कात्मतेचा व अखंडतेचा पाठ दिलाजो आजपर्यंत व पुढेही कायम राहिला हाच सुफी संताच्या जीवनाचा आदर्श व त्याग होय.

खाजासाहेबांचे आपल्या :- खाजा साहेबांना दोन मुले व दोन मुली होतया- 1. हजरत ख्वॉजा सय्यद शाह फखरोद्दीन हुसैनी चिश्ती 2. हजरत ख्वॉजा सय्यद शाह ताजोद्दीन हुसैनी चिश्ती 3. सय्यदा बीबी खातुन जन्नत 4. सय्यद बीबी जीनत खुल्ताना पत्नी - हजरता सय्यदा बीबी खुदेजा (रहे.) 16 रज्जबुल मुर्रजब 730 हिजरीला ख्वॉजा शम्सोद्दीन गाजी यांनी जगाचा निरोप घ्ोतलाउस्मानाबादच्या पावन भुमीवर विविध्ा जातीमध्ार्माचे श्रध्दाळु श्रध्देने संपूर्ण

जिल्हयातुन व जिल्हा बाहेरील भावीक उर्सामध्ये नैवदय व नवस फेडतातराष्टय एकात्मतेचे दर्शन :- पुर्वीपासून परंपरेनुसार मा. जिल्हाध्ािकारी यांना संदल घेण्याचा पहिला मान दिला जोतोकुलकर्णी, ब्राह्‌‍मण समाज, यांना दिवेचा 

मान वाणी समाज यांना तेलाचा मान

भुई समाज यांना संदल वाटण्याचा मान

परीट समाज यांना सफाई धुणेचा मान

कुंभार समाज यांना पंतीचा मान

माळी समाज यांना फुल्ा वाहण्याचा मान

वारीक समाज यांना मशाल व निमंत्रणाचा मान

नाईकवाडी यांना दिवे दिवशी प्रदिक्षणाचा मान

मुजावर यांना प्रार्थनेचा मान

फर्राश यांना ही मान

आबदार यांना पाण्याचा मान

दलित समाजाचा मान- उर्स सुरू होण्यापुर्वी दर्गाला चुना देण्यासाठी शिडी लावण्याचा मान

मशायक समाजाचा सज्जादगी व व्यवस्थापणाचा मान दिला गेला असून ख्वॉजा साहेबांची दुरदर्शी देशाच्या अखंडतेला व एकात्मतेला जोपासण्याचा एकमेव उदाहरण होय, उर्स हा 15 रज्जब ला सुरू होऊन उर्सात विविध्ा संस्कृतीक व ध्ाार्मीक कार्यक्रम घ्ोतले जातात. ऊर्साची सुरूवात पंखा, सेहरा, घ्ुासूल का पाणी व संदल मिरवणुक, चिरागाह (दिवे) कव्वालीचा मुकाबला,मुशायरा, शबे गझल, कुशती व दर्गा परिसरात दुकाने व खेळणी, पाळणे या सारखे विविध्ा प्रकारची भविकांसाठी कार्यक्रम आयोजीत करून शहरातील मोठया संख्येने विविध्ा धर्माचे लोक श्रध्दाळू सामिल होवून धर्म गुरू च्या भाष्ाणानंतर (धार्मिक व्याख्याण) फातेहा ख्वानी केली जावून प्रसाद वाटप केला जातो व अल्लाहच्या दरबारात सर्व धर्मीयांच्या लोका सुख व समृध्दीसाठी व शांततेसाठी व सर्व समाजात एकोपा राहण्याची प्रार्थना केली जाते की, जगात सर्व धर्मांमध्ये शांती सलोखा, एकता, अखंडता निर्माण होवून कायम व्हावी. सर्व ध्ार्मगुरू सुफी

संतानी आपले संपूर्ण जिवन मानवतेचया कल्याणात लोक हितासाठी आपले संपुर्ण जिवन समाजासाठी समर्पित केले, त्याचा आदर्श सर्व धर्मियांनी अवलोकन करणे व आपले जिवन लोकोपर्यागी कामासाठी सत्कार्याची भावना व्हावी एवढीच इश्वरचरणी अल्लाहच्या दरबारी प्रार्थना करावी हाच संदेश ख्वॉजा साहेबांनी सर्व धर्मीयांसाठी दिला व आजतागायत हीच परंपरा जोपासली जाते व कायम आहे. म्हणून ख्वॉजा साहेब राष्ट्रीय अखंडता व एकात्मतेचे प्रतिक आहेत. सर्व धर्मिय लोक हित व लोक कल्याण हाच एकमेव उद्देश.


                                                            ॲड. परवेज अहेमद सुबहानी,

                                                            उस्मानाबाद.


मुतवल्ली

सय्यद सरफराज हुसैनी

दर्गा हजरत खॉजा शम्सोद्दीन गाजी

उस्मानाबाद.


 
Top