तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठ्यांना आरक्षण देत असल्याचा अध्यादेश काढतच तालुक्यात मराठ्यांनी फटाक्यांची आतीष बाजी करुन कुंकवाची उधळण करीत पेढे वाढून आंनंदोत्सव साजरा करुन दुसरी साजरी केली.

आज दि. 28 जानेवारी रोजी श्री तुळजाभवानी  मातेच्या पुजा-यांनी श्रीतुळजाभवानी मातेस  दही दुध पंचामृत अभिषेक करुन महाआरती केली. मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांना दिर्घायुष्य लाभू दे असे साकडे घालुन मंदिरात कुंकवाची उधळन करीत भक्तांना पेढे वाटुन आनंदोत्सव साजरा केला. मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या वतीने ठेवण्यात आलेल्या मागण्या मान्य करत सरकारने जी आर काढुन मराठा आरक्षण देत असल्याचे  कळताच  गावोगावी मराठ्यांनी  कुंकुवाची उधळण करित फटाक्याची प्रचंड अतिषबाजी करुन पेढे वाढुन आनंदोत्सव साजरा केला. तिर्थक्षेञ तुळजापूरात छञपती शिवाजी महाराज, छञपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन कुंकवाची उधळण करीत फटाके फोडुन पेढे वाटप करुन आनंदोत्सव साजरा केला.


 
Top