धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव डायटला देश पातळीवर चांगले प्रशिक्षण केंद्र म्हणून उदयास आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन धाराशिव डाएटचे नूतन प्राचार्य डॉ. दयानंद जटनूरे यांनी सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना केले. महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या पूर्णवेळ 14 प्राचार्यांची नियुक्ती झाली आहे.तुळजापूर तालुक्यातील रहिवाशी असणारे व धाराशिव डायटला प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत असणारे डॉ. दयानंद जटनुरे यांचा देखील त्यामध्ये समावेश आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल डायट अधिकारी, कर्मचारी वृंद व कळंब येथील भैरवनाथ अध्यापक विद्यालयाने या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना डॉ. दयानंद जटनुरे म्हणाले की, धाराशिव डायटला अनेक वर्षापासूनचा चांगल्या प्राचार्यांचा वारसा असून, मी दहा वर्षे प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम केलेले आहे. त्यामुळे मानवीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून पुढील काळात देखील मी माझी जबाबदारी पार पाडेल.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.उमेश नरवडे यांनी केले. तर आभार मिलिंद अघोर यांनी मानले. या कार्यक्रमास वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.एम.बी सलगर, डॉ.शोभा मिसाळ, जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी डॉ. अरविंद मोहिरे, अधिव्याख्याता उमेश नरवडे, मिलिंद अघोर, शरीफ शेख, प्रदीप घुले, सुचित्रा जाधव, भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने, कार्यालय अधीक्षक बाळासाहेब कुदळे, महादेव वाघमारे,अमर चव्हाण, मारुती पाटील, सुनीता भोसले, संजय देसटवार, सचिन विभुते, जयश्री ढाबळे, रजाक इनामदार, नितीन पडवळ, विकास दिवटे, बालाजी भोसले, रमेश कांबळे व विवेक कदम, हनुमंत कदम यांच्यासह जिल्हा परिषदेचेही अनेक शिक्षक बांधव उपस्थित होते.


 
Top