तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ  तुळजापूर येथील श्रीतुळजाभवानी मातेचे महंत श्रीतुकोजीबुवा यांना आयोध्येतील रामलल्लाच्या मूर्तीच्या स्थापनेचे  निमंत्रण देण्यात आले आहे व निमंत्रण .पञिकाही त्यांना प्राप्त झाली आहे. देशभरातील साधू, संतांना या सोहळ्यासाठी आमंत्रित  केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर  अयोध्या रामजन्मभूमी ट्रस्टने अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य श्रीराम मंदिरारात दि. 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्याला उपस्थितीत राहण्याचे अगत्याचे निमंत्रण देवुन निमंत्रण पञिका ही दिली आहे. अयोध्यात श्रीराम  मंदिर उभारण्यासाठी धाराशिव जिल्हयातुन त्यांचा नेतृत्वाखाली निधी संकलित करुन तो राममंदीर न्यास कडे पाठवला होता. सोहळ्यात सहभागी होणार महंत तुकोजीबुवा अयोध्यात 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या श्रीराम मुर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यात आपण सहभागी होणार असल्याची माहीती देविचे महंततुकोजीबुवा यांनी दिली.


 
Top