धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या नवीन वास्तूचे मान्यवरांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी लोकार्पण झाले.सदर दिवशी जिल्ह्यातील नामांकित कवीची ग्रंथोत्सवात मैफिल रंगली.कविसंमेलनात जिल्ह्यातील साहित्यिक तथा राजकीय पदावर असूनही साहित्य सेवा जोपासणारे कवी युवराज नळे यांच्या अध्यक्षतेखाली बहारदार कविसंमेलन रंगले.

या संमेलनात सुत्रसंचलन डॉ अरविंद हंगरगेकर यांनी केले.भूम, वाशी, कळंब, तुळजापूर आणि धाराशिव येथील कवी यात सहभागी झाले होते.प्रथम सर्व कवीचे स्वागत श्री.सुधीर चिं.आचार्य जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा सदस्य सचिव समन्वय समिती यांनी केले.लोप पावत चाललेल्या गोष्टी,निरोपाचे हळवे क्षण, नात्यातील बंध, तसेच राजकारणातील अपप्रवृत्ती यावर भाष्य करणाऱ्या कविता रसिकांना मंत्रमुग्ध करत होत्या.कवी बरोबर कवयत्रीनीही सुंदर रचना सादर करून रसिकांची मने जिंकली.अध्यक्ष म्हणून व्यक्त होताना कवी युवराज नळे यांनी सर्व कवींच्या कवितांचा आढावा घेऊन सुंदर रचना सादर केली..या संमेलनात कवी डी.के.शेख, कवी शंकर कसबे,कवी शाम नवले, कवी हणमंत पडवळ, कवी भागवत घेवारे, सोनाली आरडले, ज्योती मगर,अथर्व  कुलकर्णी, अविनाश मुंढे,मेटे, समाधान शिकेतोड ,राजेंद्र टाचतोडे, संगिता भांडवले,सुमंता टाचतोडे, बनसोडे, बालकवी यश लोमटे, यांनी सहभाग नोंदविला.सर्व कवींचा सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.आभार श्री.लहू लोमटे यांनी मानले.


 
Top