तुळजापूर (प्रतिनिधी)- सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी करण्यात येत असलेले  भुसंपादन  बाधीत  शेतकऱ्यांवर  जुल्म करणारे व  अन्यायकारक असल्याने या नोटीसा तर आम्ही स्विकारणार तर नाहीच. तसेच आम्ही प्राण देवू पण आमच्या जमिनी  रेल्वेसाठी देणार नसल्याचा इशारा भातंब्रा ता.तुळजापूर येथील बाधीत शेतकऱ्यांनी उपविभागीय तथा भूसंपादन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे कि, रेल्वेसाठी आमच्या जमिनीचे केले जाणारे अन्यायकारक असल्याने यास आमचा विरोध असून, हे सदरची अन्यायकारक भूसंपादन प्रक्रिया आम्ही सहन करणार नाही. आम्हाला दिलेल्या नोटीसांमधील मावेजा अन्यायकारक असून, सदरील नोटीसा विरोधात सर्व शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलण्याची परिस्थिती आमच्यावर आणली आहे. आम्ही आमच्या मालकिची एक इंचही जमिन देणार नाही. वेळेप्रसंगी प्राण देवु पण जमिनी देणार नाही असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर संगिता गोरे, श्रीरंग गोरे, भैरवनाथ गोरे, जोतीबा गोरे, आकाश गोरे, विनायक गोरे, देविदास गोरे, चंद्रहार गोरे, जयहिंद गोरे, संगिता गोरे, हणमंत हजारे, तानाजी गोरे, नंदाबाई गोरे यासह अनेक बाधीत शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top