तुळजापूर (प्रतिनिधी)-तुळजापूर येथे स्वातंत्र्यसंग्राम सेनानी भानुदासराव जयवंतराव धुरगुडे यांच्या 104 व्या जयंती निमित्त मराठवाडा समन्वय समिती, पुणे आयोजित मराठवाडा स्तरीय मॅरेथॉन स्पर्धा दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी संपन्न झाल्या.

या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आपल्या एकलव्य विद्या संकुलातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. 3 किमी धावणे मुलांमध्ये ओमकार भोसले - द्वितीय क्रमांक, व्यंकटेश कुराडे - चौथा क्रमांक, प्रवीण जाधव - पाचवा क्रमांक, 2 किमी धावणे मुलीमध्ये अश्विनी चव्हाण - चौथा क्रमांक, शितल गायकवाड - आठवा क्रमांक, प्रणिता गाडेकर - नववा क्रमांक, मनीषा राठोड - दहावा क्रमांक, असे क्रमांक मिळून  या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम कामगिरी केली.

या सर्व खेळाडूंचे व क्रीडा विभाग प्रमुख ज्ञानेश्वर भुतेकर,बालाजी क्षीरसागर यांचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष रामचंद्रजी वैदू, कार्यवाह, विवेकजी आयचीत, उपाध्यक्ष डॉ.अभयजी शहापूरकर, मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर,विठ्ठल म्हेत्रे,संस्थेचे संचालक मंडळ व क्रीडा समितीचे सर्व सदस्य व सर्व कर्मचारी यांनी  अभिनंदन केले.


 
Top