कळंब (प्रतिनिधी)-माझ्या वडिलांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या तेरणा कारखान्यातील तीन कर्मचारी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला नसून, तत्काळ गुन्हा नोंद करण्यात यावा व सावकार यांना अटक करण्यात यावी अशी मागणी मयत अण्णासाहेब काळे यांचा मुलगा आकाश काळे यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

आत्महत्या करणाऱ्या तरुणाने सावकाराच्या नावाने चिट्टी लिहून हि पोलिसानी अद्याप हि त्या सावकाराला व तेरणा कारखान्यातील तीन कर्मचारी यांना जेरबंद न केल्याने या बाबत उलट सुलट चर्चा होऊ लागली आहे. या चौघांना तात्काळ अटक न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा कुटुंबाने दिला आहे.

मी कुटुंबासाठी काहीही करू शकलो नाही. मला सावकर व कारखान्याच्या तीन अधिकरी यांचे नावे लिहून अण्णासाहेब काळे या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. या घटनेला महिना उलटला असून, अद्याप हि चिट्टी मधील असलेल्या आरोपीला अटक करण्याचे धाडस पोलिस यांनी दाखवले नसल्याने चर्चा होत आहे. मला माफ करा, लोकप्रतिनिधीने लक्ष दिले असते तर मी आत्महत्या केली नसती, अशी चिठ्ठी सोशल मीडियावर टाकून सावकाराच्या कर्जाला व कारखान्याने मदत न केल्याने कंटाळून पिंपळगाव डोळा येथील तरुण शेतकरी अण्णासाहेब काळे यांनी आत्महत्या केली होती. 

या घटनेला एक महिना होत आला असून, अद्याप हि पोलिस प्रशासनाने कुणाला हि अटक केली नाही. कारखान्यातील तीन कर्मचारी यांची नावे पोलिसांनी नमूद हि केलेली नाहीत. या तीन हि  कर्मचाऱ्यावर तत्काळ गुन्हा नोंद करून अटक करण्यात यावी. मयत अण्णासाहेब काळे यांच्याकडे असलेले सर्व पुरावे, त्यांच्या कुटुंबाने पोलिस यांच्याकडे स्वाधीन केले आहेत. तत्काळ अटक न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा आकाश काळे यांनी दिला आहे.



 
Top