तुळजापूर (प्रतिनिधी)-श्रीतुळजाभवानी मातेच्या शांकभरी नवराञ उत्सव तील तिसऱ्या माळेदिनी देविजींच्या सिंहासनावर रथअलंकार महापुजा मांडण्यात आली होती.
शाकंभरी नवरात्र महोत्सव पौष शुक्ल पक्ष 10 (दशमी) शनिवार दि.20 /01/2024 श्री तुळजाभवानी मातेच्या सिंहासनावर रथ अलंकार महापूजा मांडली होती. रात्रौ छबिना काढण्यात आला. महत्व :भगवान सूर्यनारायणांनी श्री देवीस त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ दिला.त्या प्रसंगाची आठवण म्हणून रथ अलंकार महापूजा बांधली (मांडली) जाते.