धाराशिव (प्रतिनिधी) - पालघर जिल्हातील ता.डाहाणू बोर्डी येथील सु. पे .ह . हायस्कूल माजी विद्यार्थी संघाचे एस.आर. सावे कॅम्पिंग ग्राऊंड येथे महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ जिल्हा शाखा पालघर आयोजित दि. 19 व 20 जानेवारी 2024 दोन दिवशीय 42वी राजस्तरीय कलाशिक्षण परिषद संपन्न झाली.
पहिल्या दिवशी कोकण शिक्षक मतदार संघ आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, कलाध्यापक महामंडळ राज्यध्यक्ष नरेंद्र बाराई, राज्य उपाध्यक्ष बलराम सामंत, राज्य सरचिटणीस दिगंबर बेंडाळे, राज्य कोषाध्यक्ष विजयसिंह ठाकूर, राज्य सहचिटणीस प्रकाश पाटील राज्य महिला आघाडी प्रमुख प्रियवंदा तांबोटकर आयोजक जिल्हाध्यक्ष रुपेश वझे, कार्याध्यक्ष महेंद्र पवार, कार्यवाह नितीन जैतकर, कोषाध्यक्ष सिताराम प्रभू, उपाध्यक्ष महेंद्र पाटील चंद्रकांत, सोनावणे, प्रितम खरात महिला संघटक सौ. समिधा पाटील, मुंबई विभागीय उपाध्यक्ष विलास सेसाने, मिताली नायर मार्गदर्शक हितेंद्र ग वादे, यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न होऊ जगविख्यात शिल्पकार भगवान रामपूरे सोलापूर चर्चासत्रानंतर जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यादरम्यान राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी भ्रमणध्वनीवरूनच कार्य व्यस्ततेमुळे उपस्थित राहु शकलो नाही पण कलाध्यापकांच्या अडचणी लवकरच शिष्टमंडळ बोलवून प्रश्न मार्गी लावू व कला शिक्षण परिषेदस शुभेच्छा दिल्या सांयकाळी शास्त्रीय नृत्य अविष्कार सांस्कृतिक कार्यक्रमाने पहिल्या दिवसाची सांगता झाली 20 जानेवारी रोजी बापू बावीस्कर, संजय पऱ्हाड वारली चित्रकला प्रत्याक्षिक , योगिनी म्हात्रे कथ्थक नृत्य मार्गदर्शन , मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. त्यानंतर राज्यातील विभाग जिल्हा निहाय पदाधिकारी सत्काराने कलाशिक्षण परिषद राज्याच्या काना कोपाऱ्यातून बहुसंख्येने उपस्थित कलाध्यापकांनी उत्साहात समुद्र किनारी 42वी परिषदेचा आनंद घेतला. राज्य सल्लागार पी.आर.पाटील, दादा भगाटे, एम.ए. कादरी, हिरामण पाटील सह या 42वी कलाक्षिक्षण परिषदेसाठी धाराशिव जिल्हा कलाध्यापक संघ जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी भोसले, जिल्हाध्यक्ष नानासाहेब बोराडे, जिल्हासचिव शेषनाथ वाघ, राज्य स्तरीय कलाध्यापक पुरस्कार विजेते दतात्रय खंडागळे सह कुटुंब उपस्थित होते.