धाराशिव (प्रतिनिधी) येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा मौजे वरूडा येथे श्रमसंस्कार शिबिर गेल्या सात दिवसापासून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते. दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी या शिबिराचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सांगता समारंभ संपन्न झाला. 

सर्वप्रथम राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. माधव उगिले यांनी आपल्या प्रस्ताविकातून सात दिवस केलेल्या कामाचा आढावा विचार मंचासमोर मांडला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वैजनाथ शिंदे हे लाभले होते.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिवाजी गायकवाड यांनी केले तर आभार प्रा.बालाजी नगरे यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रा.मोहन राठोड,प्रा. स्वाती बैनवाड, प्रा.स्वाती आकोसकर प्रा. शिल्पा डोळे व महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते व मोठ्या संख्येने स्वयंसेवक स्वयंसेविका उपस्थित होते.


 
Top