भूम (प्रतिनिधी) येथील रवींद्र हायस्कूलच्या यशोदीप कांबळे याची 14 वर्षाखालील महाराष्ट्र राज्य कबड्डी संघामध्ये निवड झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगोला तालुक्यातील कडलास येथे 14 वर्षाखालील महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाची निवड करण्यासाठी सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार होती. या आयोजित नियोजित चाचणीमध्ये यशोदीप कांबळे यांनी हे घवघवीत यश मिळवीत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. झारखंड येथे संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये यशोदीप कांबळे हा महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे. त्यास रवींद्र हायस्कूलचे क्रीडाशिक्षक डॉ बा आं म विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा डॉ आप्पासाहेब हुंबे, अमर सुपेकर व कमलाकर डोंबाळे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल त्याचे संस्थेच्या संस्थापक सचिव आर. डी. सूळ,उपमुख्याध्यापिका शर्मिला सूळ यांनी कौतुक केले.